अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी कर्ज उभारण्याची सरकारची योजना
Posted On:
26 SEP 2024 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2024
केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून, आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी (H2) कर्ज उभारण्याच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 साठी सकल बाजारातील 14.01 लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या निर्धारित अंदाजापैकी दुसऱ्या सहामाहीत डेटेड सिक्युरिटीज जारी करून 6.61 लाख कोटी रुपये (47.2%) कर्ज उभारण्याची योजना आहे, ज्यात 20,000 कोटी सॉव्हरेन ग्रीन बाँड्सचा समावेश आहे.
बाजारातील एकूण 6.61 लाख कोटी रुपये कर्जाची प्रक्रिया 21 साप्ताहिक लिलावांद्वारे पूर्ण केली जाणार आहे. बाजारातील कर्ज 3, 5, 7, 10, 15, 30, 40 आणि 50 वर्षांच्या कालावधीच्या सिक्युरिटीजच्या माध्यमातून घेतले जाईल.
रिडम्प्शन प्रोफाइल सुलभ करण्यासाठी सरकार सिक्युरिटीजचे स्विचिंग/बायबॅक करेल.
लिलावाच्या अधिसूचनांमध्ये दर्शविलेल्या प्रत्येक सिक्युरिटीजसंदर्भात 2,000 कोटी रुपयांपर्यंत ग्रीनशू पर्याय वापरण्याचा अधिकार सरकार यापुढेही राखून ठेवेल.
अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रसिद्धीपत्रकात अधिक तपशील पाहता येतील.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2059234)
अभ्यागत कक्ष : 85