उपराष्ट्रपती कार्यालय
आर्थिक संसाधनांबाबत केवळ वचने आणि संशोधन व विकासासाठी पोकळ आश्वासने पुरेशी नाहीत; ठोस परिणाम हे लक्ष्य हवे – उपराष्ट्रपती
संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक करण्याचे उपराष्ट्रपतींचे कॉर्पोरेट्सना आवाहन
सीएसआयआरच्या 83 स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचे संबोधन
Posted On:
26 SEP 2024 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2024
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले की संशोधन आणि विकास हा “ठोस आणि त्याची निष्पत्ती भरीव असली पाहिजे, वरवरची किंवा उथळ नसावी,” ते पुढे म्हणाले की आर्थिक संसाधनांबाबत केवळ वचने पुरेशी नाहीत आणि कोणत्याही संशोधनाचे महत्व ठोस परिणामात मोजले पाहिजे’.
सीएसआयआरच्या 83 स्थापना दिनानिमित्त पुसा मार्ग, नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात आज उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी संशोधन आणि विकासाच्या वर्तमानातील महत्त्वाकडे लक्ष वेधून घेतले. सॉफ्ट डिप्लोमसी आणि राष्ट्रीय सुरक्षेकरता संशोधन आणि विकास अविभाज्य असल्याचे ते म्हणाले.
सद्यस्थितीत वैज्ञानिक समुदायाबाबतची जाण लक्षणीयरित्या वाढल्याबद्दल धनखड यांनी समाधान व्यक्त केले.
संशोधन आणि विकासासाठी अधिक गुंतवणूक करण्याचे खाजगी क्षेत्राला आवाहन करून ते म्हणाले,“वाहने आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांत भारतीय कंपन्या दखल घेण्याजोगे योगदान देत आहेत. आपल्या देशाचा आकार, सुप्त क्षमता, स्थान आणि वाढीचा आलेख लक्षात घेता आपल्या खाजगी उद्योग जगताने संशोधन आणि विकास क्षेत्रासाठी पुढे येण्याची गरज आहे.”
सीएसआयआरचा उल्लेख वैज्ञानिक कल्पनाशक्तीला उत्प्रेरक राष्ट्र असा करून धनखड म्हणाले, “हा तुमचा स्थापना दिवस असला तरीही तो भारताच्या भक्कम पायाशी अखंड जोडलेला आहे.”
त्यांनी देशाच्या वाढीचे इंजिन म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. हे इंजिन प्रामुख्याने संशोधन आणि विकास (आर एण्ड डी) या इंधनावर चालते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
भारतीय संस्थांमध्ये सध्या संशोधन आणि विकासाविषयी दिसून येणाऱ्या दृष्टिकोनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करून धनखड यांनी सांगितले की पोकळ आश्वासनांपेक्षा भरीव योगदानाची गरज आहे.
तत्पूर्वी उपराष्ट्रपतींनी एनएएससी संकुलात सीएसआयआर संकल्पिक प्रदर्शन 2024 चे उद्घाटन केले.
उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी पाहा: pib.gov.in/PressRelese
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2059138)
Visitor Counter : 50