वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित हिंद-प्रशांत आर्थिक मंच पुरवठा साखळी परिषद आणि आपत्ती प्रतिसाद नेटवर्कच्या बैठकीला भारतीय प्रतिनिधिमंडळाची प्रथमच प्रत्यक्ष उपस्थिती


सेमीकंडक्टर; बॅटरीवर लक्ष केंद्रित करून दुर्मिळ खनिजे; रसायने यासाठी पुरवठा साखळी लवचिकता सुलभ करण्यासाठी तीन कृती आराखडा गटांचे गठन

Posted On: 23 SEP 2024 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 सप्‍टेंबर 2024

 

भारतीय प्रतिनिधिमंडळाने 12 सप्टेंबर 2024 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित समृद्धीसाठी  हिंद-प्रशांत आर्थिक मंच (आयपीईएफ) पुरवठा साखळी परिषदेच्या पहिल्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थिती लावली. त्यानंतर 13 सप्टेंबर 2024 रोजी आपत्ती प्रतिसाद नेटवर्क बैठकीला हजेरी लावली. या औपचारिक बैठकांपूर्वी समर्पित पुरवठा साखळी केंद्राची निर्मिती आणि स्केल सारख्या साधनाचा विकास यासह अमेरिकेच्या उपक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित करून पुरवठा साखळी लवचिकतेशी संबंधित विविध विषयांवर प्रतिनिधिमंडळ स्तरीय चर्चा झाली.

अमेरिका हा पुरवठा साखळी परिषदेचा अध्यक्ष तर भारत उपाध्यक्ष आहे. या बैठकीत लक्षणीय प्रगती झाली. परिषदेने वर्षभरासाठी करावयाच्या कार्यवाहीचा तपशील देणारा एक वर्षाचा कार्य आराखडा स्वीकारला. याशिवाय, सेमीकंडक्टर, बॅटरीवर लक्ष केंद्रित करून दुर्मिळ खनिजे; आणि पुरवठा साखळी लवचिकता सुलभ करण्यासाठी रसायने या तीन क्षेत्रांशी संबंधित तीन कृती योजना गटांचे गठन ही प्रमुख कामगिरी  होती. 

आरोग्यसेवा/औषधनिर्माण क्षेत्राशी संबंधित आणखी एक कृती योजना गट गठीत करण्यासाठी भागीदार देशांनीही मुख्यतः सहमती दर्शवली, ज्यामध्ये अध्यक्ष ठरल्यावर कृती आराखडा गट कार्यान्वित होईल. 

   

या क्षेत्रांमध्ये कृती योजना गटांची निर्मिती ही आज त्यांच्या केंद्रित पुरवठ्यातील आणि कोविड-19 महामारीदरम्यान आलेल्या लक्षणीय व्यत्ययांमधून मिळालेला अनुभव लक्षात घेता बहुतांश महत्वाच्या पुरवठा साखळींमध्ये अत्यंत प्रासंगिक आहे.

विशेष लक्ष अभिप्रेत असणाऱ्या समस्यांसाठी दोन उपसमित्यांची स्थापना हे आणखी एक मोठे यश  होते.

आयपीईएफ पुरवठा साखळी परिषदेच्या पहिल्या प्रत्यक्ष स्वरूपाच्या बैठकीनंतर, 13 सप्टेंबर 2024 रोजी कोरियाच्या अध्यक्षतेखाली आपत्ती प्रतिसाद नेटवर्क (सीआरएन) ची बैठक झाली. पुरवठा साखळीतील व्यत्यय तात्काळ दूर करण्यावर सीआरएन लक्ष केंद्रित करते.

भारतासह आयपीईएफ भागीदार देश कृती योजना संघ आणि त्यांच्या आवडीच्या उपसमित्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी वचनबद्ध आहेत कारण ते संपूर्ण आयपीईएफ क्षेत्रामध्ये पुरवठा शृंखला लवचिकता मजबूत करण्याच्या उद्देशाने कृतीयोग्य धोरणे आणि शिफारसी विकसित करण्यासाठी सहयोगी आणि सहकारी पद्धतीने एकत्र काम करतात.

   

या आयपीईएफ बैठकींच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, मलेशिया, इंडोनेशिया आणि कोरिया यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठका देखील आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी आणि या प्रदेशात मजबूत पुरवठा साखळी सुलभ करण्याच्या आगामी वाटचालीसाठी द्विपक्षीय बैठकांचे आयोजन देखील करण्यात आले होते. 

पुरवठा साखळी परिषदेची पुढील बैठक डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058059) Visitor Counter : 25


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali