वस्त्रोद्योग मंत्रालय
स्वच्छता ही सेवा 2024 मोहिमेत देशव्यापी उपक्रमांसह वस्रोद्योग मंत्रालयाचा सहभाग
Posted On:
23 SEP 2024 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2024
'स्वच्छता ही सेवा 2024' या मोहिमेचा एक भाग म्हणून, वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यांची कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि संलग्न संस्थांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन उपक्रमांची मालिका आयोजित केली. कर्मचारी, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या समावेशाने, टाकाऊ सामग्रीपासून संपत्ती(वेस्ट टू वेल्थ) या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले.
एनआयएफटी संकुलात वेस्ट टू वेल्थ उपक्रम
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (NIFT) संकुलात, विद्यार्थ्यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’ उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाने केवळ पर्यावरणीय भान निर्माण करण्याला प्रोत्साहन दिले नाही तर टाकाऊ सामग्रीचा योग्य वापर करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रकारांचे दर्शन घडवले.
वस्त्रोद्योग समितीकडून अभिलेखांचे डिजिटल रुपांतरण
वस्त्रोद्योग समितीने, तिच्या मुख्यालयात आणि देशभरातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये, अभिलेखांच्या डिजिटायझेशनला चालना देऊन 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत योगदान दिले.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) येथे स्वच्छता मोहीम
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) ने देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
घोषवाक्य लेखन आणि चित्रकला स्पर्धा
समुदायांना सहभागी करून घेण्यासाठी, वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये घोषवाक्य लेखन, बोधवाक्य लेखन आणि चित्रकला स्पर्धांसह विविध स्पर्धांचे आयोजन केले.
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुख्यालयात सखोल स्वच्छता मोहीम
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुख्यालयात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी विविध विभाग आणि उपविभागांना भेटी दिल्या.
* * *
JPS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057977)
Visitor Counter : 38