अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'वर्ल्ड फूड इंडिया 2024' चा समारोप


1557 प्रदर्शक, 20 देशांची दालने; 108 देशांतील 809 खरेदीदार व 2390 परदेशी प्रतिनिधींची उल्लेखनीय उपस्थिती

13 राज्य मंत्री आणि 4 केंद्रीय मंत्र्यांची कार्यक्रमाला उपस्थिती

Posted On: 22 SEP 2024 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित 'वर्ल्ड फूड इंडिया 2024' आज संपन्न झाला. हा अन्न उद्योगाचा तिसरा महा मेळावा 19 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, नूतन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री  प्रल्हाद जोशी, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि अन्न प्रक्रिया उद्योग व रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले.

Image  Image

यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग उत्पादन सामूहिक प्रोत्साहन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनांतर्गत 67 ठिकाणी अन्न प्रक्रिया एककांसह एकूण 5135 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजने अंतर्गत सूक्ष्म प्रकल्पांसाठी 2,351 कोटी रुपयांचे ऋण-सहाय्य 25,000 लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले आणि याच योजने अंतर्गत 70,000 बचत गट (एसएचजी) सदस्यांना 245 कोटी रुपयांचे बीज भांडवल मंजूर करण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकारी, जागतिक गुंतवणूकदार, जागतिक अन्न नियामक आणि उद्योग विश्वातील आघाडीचे उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमाने सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा एक महत्वपूर्ण टप्पा साध्य केला.

Image  Image

हा महा अन्न मेळावा भारत सरकारची 9 मंत्रालये/विभाग, 8 संबंधित संस्था आणि 26 राज्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 1557 प्रदर्शक, 20 देशांची दालने आणि 108 देशांतील 809 खरेदीदार आणि 2390 परदेशी प्रतिनिधींची उपस्थिती होती. 13 राज्यमंत्री आणि 4 केंद्रीय मंत्री वर्ल्ड फूड इंडिया 2024 मध्ये सहभागी झाले.

70,000 चौरस मीटरमध्ये 9 प्रदर्शन हॉलमध्ये पसरलेल्या या कार्यक्रमाने अन्न प्रक्रिया उद्योगातील ताज्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ प्रदान केले. कार्यक्रमात 100 हून अधिक ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अशी उत्पादने दाखवण्यात आली. 16 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळे, ज्यात 6 मंत्री प्रतिनिधीमंडळांचा समावेश होता, या कार्यक्रमात सहभागी झाले. जपानने भागीदार देश म्हणून तर इराण व व्हिएतनामने केंद्रित देश म्हणून सहभाग घेतला.

Image  Image

20-21 सप्टेंबर 2024 दरम्यान भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारे जागतिक अन्न नियामक शिखर परिषद 2024 देखील वर्ल्ड फूड इंडियाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली. यामध्ये 70 हून अधिक देशांतील अन्न सुरक्षा नियामक, जोखीम मूल्यांकन प्राधिकरणे, संशोधन संस्थांचे प्रतिनिधी व विद्यापीठांचे तज्ञ उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057670) Visitor Counter : 65


Read this release in: English , Urdu , Hindi