विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता (एसएसए) संदर्भात एरिज आणि बेल यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 21 SEP 2024 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

उपग्रह आणि त्यांच्या वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अवकाशातील वस्तू, विशेषत: पृथ्वीच्या जवळच्या वस्तू आणि कृत्रिम उपग्रह यांचा मागोवा घेण्यासाठी लवकरच प्रतिमा प्रक्रिया तंत्र, डेटा विश्लेषण उपायांसाठी सॉफ्टवेअर तसेच उपकरणे आणि प्रयोगशाळा लवकरच विकसित केल्या जाणार आहेत. अशा मागोवा घेण्याच्या पद्धतीला स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस (एसएसए) अर्थात अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता म्हणतात.

नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थेने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न संरक्षण उपक्रमासोबत अंतराळ तंत्रज्ञानामध्ये, विशेषत्वाने अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकतेवर लक्ष केंद्रित करून सहयोग करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमांच्या अनुषंगाने भारताच्या अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता आणि तांत्रिक क्षमतांना पुढे नेण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अंतराळातील वस्तूंमधील संभाव्य टक्कर होण्याबाबत अंदाज वर्तवणे, इशारा देणे आणि टक्कर टाळणे यासाठी अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता आवश्यक आहे.

               

या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, एरिज आणि बेल या दोन्ही संस्था या उद्देशासाठी एरिजच्या 4m इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप (आयएलएमटी)  सारख्या अत्याधुनिक दुर्बिणींच्या निरीक्षणांचा उपयोग करतील.  दोन्ही संस्था संयुक्तरित्या प्रतिमा प्रक्रिया तंत्र आणि डेटा विश्लेषण उपायांसाठी सॉफ्टवेअर विकसित करतील.  या संस्था उपकरणे आणि प्रयोगशाळांच्या विकासासाठीही सहकार्य करतील. अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता संदर्भात क्षमता वाढीसाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातील. एरिज संस्था अवकाशातील हवामानाबाबतचे आपले कौशल्य देखील सामायिक करेल.

या सामंजस्य करारावर बेल च्या गाझियाबाद येथील एककामध्ये एरिजचे संचालक प्राध्यापक दीपंकर बॅनर्जी आणि महाव्यवस्थापक (एससीसीएस) आणि एकक प्रमुख रश्मी कथुरिया यांनी एरिजमधील डॉ. ब्रिजेश कुमार, डॉ. टी. एस. कुमार आणि डॉ. एस. कृष्णा प्रसाद, तसेच बेल मधील वरिष्ठ अधिकारी, संचालक (ओयु) भानू प्रकाश श्रीवास्तव, सीएस (सीआरएल - जीएडी) अनूप कुमार राय, आणि सहाय्यक महाव्यवस्थापक (मार्केटिंग) पुनीत जैन यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057384) Visitor Counter : 52


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil