नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि मंत्रालयांच्या अखत्यारितील सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना आणि संस्थांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठीची विशेष मोहीम 4.0 राबवली जाणार

Posted On: 21 SEP 2024 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

प्रशासकीय सुधारणा आणि लोकतक्रार विभागाच्या वतीने येत्या 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता विषयक विशेष अभियान 4.0 सुरू केले आहे. स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप द्यावे आणि त्याचवेळी सरकारी कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणे कमी करता यावीत, हे या विशेष अभियानाचे उद्दिष्ट आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि त्याच्या अखत्यारीतील भारतीय नवीकरणीय उर्जा विकास यंत्रणा मर्यादित Indian Renewable Energy Development Agency Ltd. - IREDA) तसेच आणि भारतीय सौर उर्जा महामंडळ मर्यादित (Solar Energy Corporation of India Ltd. - SECI) या दोन सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय कंपन्यांसह, राष्ट्रीय सौर उर्जा संस्था (National Institute of Solar Energy - NISE), राष्ट्रीय पवन उर्जा संस्था (National Institute of Wind Energy - NIWE),  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी (एनआयएसई), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी (एनआयडब्ल्यूई) आणि सरदार स्वर्ण सिंग राष्ट्रीय जैव उर्जा संस्था (Sardar Swaran Singh National Institute of Bio Energy - SSS - NIBE) या तीन स्वायत्त संस्थामधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठीच्या विशेष मोहीम (Special Campaign Disposal of Pending Matters -SCDPM) 4.0 च्या पूर्वतयारीच्या टप्प्याची अंमलबजावणी 16 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली असून ती 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

याआधी पार पडलेले विशेष अभियान 3.0 देखील मंत्रालय आणि मंत्रालयाच्या अखत्यारितील सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना आणि संस्थांमध्ये यशस्वीरित्या राबवले गेले. मंत्रालयाने विशेष अभियान 3.0 मध्ये खाली नमूद श्रेणींमध्ये 100% उद्दिष्टे साध्य केली होती:

  1. नागरिकांच्या तक्रारी
  2. नागरिकांच्या तक्रारींशी संबंधित अपील
  3. भौतिक स्वरुपातील फाईलींचे पुनरावलोकन
  4. ई - फाइल्सचे पुनरावलोकन
  5. स्वच्छता अभियानांचे प्रमाण

मंत्रालय आणि मंत्रालयाच्या अखत्यारितील सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना आणि संस्थांमध्ये सध्याच्या पूर्वतयारीच्या टप्प्याअंतर्गत 16 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत खाली नमूद उपक्रम राबवले जात आहेत :

  1. पूर्वतयारीच्या या टप्प्यात विविध निकषांच्या आधारे प्रलंबित प्रकरणे निश्चित केली जात आहेत.
  2. कार्यालयीन प्रक्रियेसाठीच्या केंद्रीय सचिवालय नियमावलीमधील (Central Secretariate Manual of Office Procedure - CSMoP) तरतुदींनुसार तसेच सार्वजनिक अभिलेख अधिनियम, 1993 मधील विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपलब्ध दस्तऐवजांचे व्यवस्थापन, वर्गीकरण, नोंदी संकलन, पुनरावलोकन आणि भौतिक नोंदींचे परीक्षण केले जात आहे.
  3. या मोहीमेच्या उद्देशानुसार शासकीय कार्यालयांची एकंदर स्वच्छता राखली जात आहे.
  4. या टप्प्याअंतर्गत 26 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अटल अक्षय ऊर्जा भवनातील परिषद सभागृह 319 मध्ये सकाळी 11.30 वाजता कार्यालयीन प्रक्रियेसाठीच्या केंद्रीय सचिवालय नियमावलीमधील (Central Secretariate Manual of Office Procedure - CSMoP) 10 व्या प्रकरणाशी संबंधित प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या विशेष अभियान 4.0 च्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा टप्पा 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. या अंमलबजावणीच्या कालावधीत या अभियानाच्या पूर्वतयारीच्या टप्प्यात  निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

 

* * *

M.Pange/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057370) Visitor Counter : 20


Read this release in: English , Hindi