कृषी मंत्रालय
विशेष मोहीम 4.0 अंतर्गत 16 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत पूर्वतयारीच्या टप्प्यात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपक्रम
Posted On:
21 SEP 2024 2:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
सरकारी कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करण्यासाठी, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाकडून (DARPG) विशेष मोहीम 4.0 सुरू करण्यात आली. विशेष मोहीम 4.0 प्रामुख्याने 15 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तयारीचा टप्पा आणि 2 ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्य टप्पा अशा दोन टप्प्यांत राबवण्यात येत आहे.
तयारीच्या टप्प्यासाठी, या विभागाचे सर्व सेक्शन्स / डिव्हिजनच्या सर्व नोडल अधिका-यांसह आणि कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीनस्थ/संलग्न कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि प्राधिकरण यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यांना प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (DARPG) मार्गदर्शक तत्त्वांच्या निकषांनुसार प्रलंबितता विचारात घेण्यास सांगण्यात आले आहे. या विभागाने तयारीच्या टप्प्यावर एक PIB नोट आधीच जारी करण्यात आली आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांच्यासह या विभागाचे अतिरिक्त सचिव आणि सहसचिव, यांनी कृषी भवनातील विविध मजल्यांना भेट देऊन इमारतीच्या स्वच्छतेचा आढावा घेतला.
अतिरिक्त सचिव आणि सहसचिव यांच्यासह सचिवांनी दस्तऐवज व्यवस्थापनाच्या प्रगतीचा आणि त्या स्थानांवरील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शास्त्री भवनातील दस्तऐवज कक्ष आणि विविध सेक्शन्स/ डिव्हिजन्सना भेट दिली.
* * *
JPS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057284)
Visitor Counter : 54