विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
स्वच्छता ही सेवा 2024 चा भाग म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
Posted On:
20 SEP 2024 12:05PM by PIB Mumbai
देशात स्वच्छतेला चालना देण्यासाठी भारताच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा (एसएचएस) 2024 मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त, “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही यावर्षीची संकल्पना असून, भारतातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छता ही एक नैसर्गिक सवय आणि मूलभूत सामाजिक मूल्य बनवणे हा तिचा उद्देश आहे. ही मोहीम लोकसहभागाला प्रोत्साहन देते आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. याद्वारे तळागाळातील स्तरावरील विविध उपक्रमांचे एकत्रीकरण करून भारत स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना सहभागी करण्यात येत आहे.
मोहिमेच्या उद्दिष्टापासून प्रेरणा घेऊन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) या मोहिमेअंतर्गत उपक्रम म्हणून इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते ज्यात मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
‘माझ्या स्वप्नातील स्वच्छ भारत’ ही स्पर्धेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून चित्रे रेखाटताना मुलांच्या कल्पकतेला वाव मिळाला. आपण सर्व जाणतोच की मुले ही कोणत्याही राष्ट्राची भविष्यातील संपत्ती असतात, त्यामुळे त्यांच्या बालपणातील अशी संस्कारित मूल्ये आणि नैतिकता त्यांना सु-शिस्तबद्ध नागरिक म्हणून विकसित करण्यासाठी पाया घालतील. या चित्रकला स्पर्धेने तो दृष्टिकोन आणि भावना जपण्याची मानसिकता रुजवली.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि डीएसटी सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांनी स्पर्धेतील खालील विजेत्यांचा सत्कार केला:
प्रथम पारितोषिक: नागालँडच्या किफिरे येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा फरहादुल इस्लाम तालुकदार
द्वितीय पारितोषिक: ओदिशातील संबळपूर येथील डी. ए. व्ही पब्लिक स्कूल चा श्रीयांस श्रीतम प्रधान
तिसरे पारितोषिक: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील मंथन स्कूल चा अनय द्विवेदी
उत्तेजनार्थ पारितोषिके:
1. हरियाणाच्या झज्जर येथील एसडी उच्च माध्यमिक विद्यालयाची कु. कनक
2. कर्नाटकातील सिरसी कारवार येथील एम.ई.एस तेलंग माध्यमिक विद्यालयाचा प्रवीण गोपाल नायक
***
NilimaC/VasantiJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2056947)
Visitor Counter : 56