उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्यक्तिकेंद्रीत दृष्टिकोन दूर सारून संस्थांवर लक्ष केंद्रीत करण्याचे उपराष्ट्रपतींचे प्रसारमाध्यमांना आवाहन


उपराष्ट्रपतींनी राष्ट्राच्या विकासासाठी केले सहयोग आणि निष्पक्षपाती प्रयत्नांचे आवाहन

उपराष्ट्रपतींनी संसद टीव्ही@3 परिषदेच्या उद्घाटन सत्राला केले संबोधित

Posted On: 19 SEP 2024 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2024


उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताविरोधात धोकादायक हेतू बाळगणाऱ्यांपासून लांब राहण्याचा सावधगिरीचा इशारा आज दिला आणि वैमनस्यपूर्ण शक्तीकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अस्तित्वाच्या आव्हानांकडे लक्ष वेढले.

ठराविक व्यक्ती देशात आणि देशाबाहेर भारताच्या संस्था आणि राष्ट्रीय विकासाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेच्या सभागृहात संसद टीव्ही@3 परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. धनखड यांनी राष्ट्राच्या वाटचालीला दिशा देण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते याकडे लक्ष वेधले आणि प्रसारमाध्यमांनी वृत्तांकनात व्यक्तिकेंद्रीत दृष्टिकोन दूर सारून राष्ट्राचा विकास व संस्थांवर लक्ष केंद्रीत करण्याचे गरज व्यक्त केली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांच्या भूमिकेच्या मुद्द्यावर भर देत धनखड यांनी टीकेच्या वाढत्या कलाबाबत काळजी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी देशाच्या विविध भागांतील विकासाच्या सकारात्मक कथा असाव्यात,यावर त्यांनी भर दिला.

जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा राखण्याचे महत्त्व स्पष्ट करून धनखड म्हणाले, “आपण भारताविषयी चुकीची प्रतिमा विशेषतः देशाबाहेर निर्माण होऊ देता कामा नये.”

राष्ट्रीय विकासासाठी सहयोग आणि निष्पक्षपाती प्रयत्नांचे आवाहन करताना धनखड यांनी सांगितले की देशाची प्रगती राजकीय भिंगातून पाहिली जाऊ नये.

जमीन, समुद्र, आकाश आणि अंतराळ अशा सर्व क्षेत्रांत भारताने केलेल्या लक्षणीय प्रगतीकडे लक्ष वेधून त्यांनी भारताचा विशेषतः ग्रामीण भागातील वेगवान विकास - परवडणाऱ्या किमतीत घरे, संपर्क यंत्रणा आणि सौर ऊर्जेवर घरांना वीजपुरवठा यांमुळे जीवनात बदल घडून आल्याचे सांगितले.

आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्था आता केवळ उच्चभ्रूंची मक्तेदारी राहिली नसून त्या सर्वांना खुल्या झाल्या आहेत, असा पुनरुच्चार उपराष्ट्रपतींनी केला.

 

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2056835) Visitor Counter : 47