कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
फ्रान्समध्ये ल्यो या शहरात झालेल्या जागतिक कौशल्ये -2024 मध्ये भारताची चमकदार कामगिरी
Posted On:
16 SEP 2024 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
भारताने फ्रान्समधील ल्यो शहरात झालेल्या जागतिक कौशल्ये - 2024 स्पर्धेत जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने पॅटिसेरी आणि कन्फेक्शनरी विभागात प्रतिष्ठित 04 कांस्य पदकांची कमाई केली आहे. पॅटिसेरी अर्थात जेथे केक आणि पेस्ट्री तयार केल्या जातात आणि कन्फेक्शनरी जेथे मिठाई तयार केली जाते, या विभागात अश्विता पोलिस, इंडस्ट्री 4.0- ध्रुमिलकुमार धीरेंद्रकुमार गांधी आणि सत्यजीत बालकृष्णन, हॉटेल रिसेप्शन- ज्योतिरादित्य कृष्णप्रिया रविकुमार आणि नवीकरणीय ऊर्जा- अमरेश कुमार साहू यांनी पदके मिळवली आहेत.याशिवाय,भारतीय शिष्टमंडळाने उत्कृष्ट कामगिरीसाठी 12 पदके मिळवली आहेत. ही पदके विजेत्यांच्या असामान्य कौशल्याचा आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा पुरावा आहेत.
पॅटिसेरी आणि कन्फेक्शनरी विभागातून स्पर्धेत सहभागी झालेल्या अश्विता पोलिस यांनी भारतीय संघातील सर्वात उत्कृष्ट स्पर्धक बनून राष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सहभागी पुरस्कार देखील जिंकला.
फ्रान्समधील ल्यो शहरात झालेल्या जागतिक कौशल्ये - 2024 मध्ये भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
Best Of Nation
|
Competitor
|
State
|
Patisserie and confectionery
|
Ashwitha Police
|
Telangana
|
Bronze
|
Competitor
|
State
|
Patisserie and confectionery
|
Ashwitha Police
|
Telangana
|
Industry 4.0 (Team Skill)
|
Dhrumilkumar Dhirendrakumar Gandhi & Sathyajith Balakrishnan
|
Gujarat
|
Hotel Reception
|
Joethir Adithya Krishnapriya Ravikumar
|
Delhi
|
Renewable Energy
|
Amaresh Kumar Sahu
|
Odisha
|
|
|
|
Medallions of Excellence
|
|
|
Mechatronics (Team Skill)
|
Darshan Gowda Chathralinganadoddi Shivalingaiah & Bhanuprasad Settihalli Mariswamy
|
Karnataka
|
Web Technology
|
Md Aman Khan
|
West Bengal
|
Cabinet Making
|
Rajesh Sharma
|
Bihar
|
Jewellery
|
Tufan Mal
|
West Bengal
|
Beauty Therapy
|
Pritisha Barman
|
Assam
|
Automobile Technology
|
Praful Ankush Pendhari
|
Maharashtra
|
Cooking
|
Harshavardhan Vijay Khandare
|
Karnataka
|
Car Painting
|
Vikash
|
Delhi
|
Graphic Design Technology
|
Jaahnvi
|
Punjab
|
Cyber Security (Team Skill)
|
Prashant Saini & Sanskar Sharma
|
Madhya Pradesh & Uttarakhand
|
Water Technology
|
Akhil Gedela
|
Odisha
|
Additive Manufacturing
|
Prem Vasanth Kumar
|
Karnataka
|
जागतिक कौशल्ये ल्यो 2024 स्पर्धेत 70 हून अधिक देशांतील 1400 हून अधिक सहभागींनी विविध कौशल्य श्रेणींमध्ये सहभाग नोंदवला होता. भारताने 52 कौशल्यांमध्ये चीन, जपान, कोरिया, सिंगापूर, जर्मनी, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, डेन्मार्क, फ्रान्स, ब्रिटन , दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, अमेरीका इत्यादी देशांविरुद्ध पदकांसाठी कडवी झुंज दिली.
भारतीय संघातील सहभागींपैकी बरेच जण प्रथमच जागतिक व्यासपीठावर स्पर्धेत उतरले होते, ते स्पर्धक आपल्या कामगिरीने आनंदित झाले. स्पर्धेतल्या यशामुळे नवीन ओळख प्राप्त झालेल्या यशस्वी तरुणांनी आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आणि आपल्याला केलेल्या मार्गदर्शनासाठी त्यांचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांचे आभार मानले. अनेक विजेत्यांनी आपले जीवन आणि कारकिर्दीचे मार्ग बदलण्यात कौशल्याचे महत्त्व आणि त्याची भूमिका अधोरेखित केली.
भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले.“भारतीय संघाच्या जागतिक कौशल्ये - 2024 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आपल्या देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले. कांस्य पदके आणि उत्कृष्टतेची पदके जिंकणे हे केवळ वैयक्तिक यश नसून देश कौशल्यांवर वाढीव भर देत असल्याचा दाखला आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुण स्पर्धकांनी केवळ त्यांची वैयक्तिक प्रतिभाच दाखवली नाही तर कौशल्य विकासात जागतिक स्तरावर उत्कृष्टता प्राप्त करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे, असेही ते म्हणाले.हे यश यश अधिकाधिक तरुणांना भविष्यासाठी तयार कौशल्यांसह सक्षम बनवण्याचा आमचा संकल्प मजबूत करते, यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या विकासाला चालना मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुशल आणि विकसित भारताचा दृष्टिकोन पूर्ण होईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक कौशल्ये - 2024 मधील भारतीय तुकडीचे यश हे जागतिक कौशल्य नेता बनण्याच्या देशाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.जागतिक कौशल्ये - 2024 मधील भारताची 12 उत्कृष्टता पदके मेकॅट्रॉनिक्स आणि सायबर सुरक्षा या पारंपरिक आणि ज्वेलरी आणि ब्युटी थेरपी यासारख्या उदयोन्मुख कौशल्यांच्या श्रेणीमध्ये देशाच्या विलक्षण कौशल्यावर प्रकाश टाकतात.कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि उद्योग भागीदारांच्या मदतीने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण कार्यक्रम, मॉक स्पर्धा आणि नवीनतम तंत्रज्ञानाची ओळख करून देणे याद्वारे स्पर्धकांना तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055457)
Visitor Counter : 128