संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'एअर फोर्स असोसिएशन'च्या वार्षिक दिनाचा समारंभ

Posted On: 15 SEP 2024 5:05PM by PIB Mumbai

 

एअर फोर्स असोसिएशन (AFA) ने आज 44 वा वार्षिक दिन साजरा केला. या कार्यक्रमाचा भाग म्हणून AFA चे अध्यक्ष निवृत्त एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सशस्त्र सैन्यदलांच्या सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय वायुसेनेच्या सर्व जेष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने 15 सप्टेंबर 2024 च्या सकाळी राष्ट्रीय युद्धस्मारकावर पुष्पचक अर्पण केले. यानंतर नवी दिल्लीत सुब्रतो पार्क येथे हवाई दलाच्या प्रेक्षागारात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

वायुदल प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, या सभेच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक निवृत्त वायुदल प्रमुखांनी तसेच सध्या सेवारत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थिती लावली.

एअर फोर्स असोसिएशन ही अशासकीय क्षेत्रातील कल्याणकारी संघटना असून वायुदलातील ज्येष्ठांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ही संघटना कार्यरत आहे. विधवांच्या तसेच अनाथ बालकांच्या पीडा दूर करण्यासाठीही ही संघटना वचनबद्ध आहे. 15 सप्टेंबर 1980 या दिवशी, मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग DFC यांच्या छत्रछायेखाली या संघटनेची स्थापना झाली. देशभरात या संघटनेच्या वीस शाखा आहेत. युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियामध्येही संघटनेच्या दोन शाखा आहेत. संघटनेत वायुदलाच्या 98494 ज्येष्ठांचा आणि 7470 जोडीदार सदस्यांचा सहभाग आहे.

***

G.Chippalkatti/J.Waishmpayan/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2055276) Visitor Counter : 60


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil