संरक्षण मंत्रालय
म्यानमारमधील यागी चक्रीवादळात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाची तयारी सुरू
Posted On:
15 SEP 2024 8:28PM by PIB Mumbai
अचानक कोसळलेला पावसाने म्यानमारमध्ये उद्भवलेल्या विनाशकारी पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मानवतावादी मदत आणि आपत्ती बचाव (HADR) मोहीम उघडण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाने जलद गतीने तयारी सुरू केली आहे. दक्षिण चीन समुद्रात उगम पावलेल्या यागी चक्रीवादळाचा म्यानमारमधील अनेक प्रदेशांना मोठा फटका बसला आहे.
पूर्व नौदल कमान आणि पौर्वात्य ताफे तसेच अन्य विभाग यांच्या समन्वयातून HADR सामग्री जहाजावर भरण्याचे काम रातोरात पूर्ण झाले आहे. यामध्ये INHS कल्याणीसह बीव्हीवाय आणि सामग्री संघटन विभागांचा सक्रिय सहभाग आहे. या सामग्रीत HADR साधने, पिण्याचे पाणी, शिधा आणि औषधे समाविष्ट असून ही सामग्री भरलेल्या नौका विशाखापट्टण मधून यांगून साठी निघणार आहेत. अत्यंत कमी वेळ मिळूनही जलदगतीने ही जुळवाजुळव करण्यात आली आहे. आपल्या प्रदेशात मानवतेसमोर संकट उभे ठाकले असता झटपट प्रतिसाद देण्याची नौदलाची क्षमताच यातून अधोरेखित होते.
***
G.Chippalkatti/J.Waishmpayan/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055274)
Visitor Counter : 85