कृषी मंत्रालय
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची सर्व कार्यालये ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेसह 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम’ करणार साजरी
मोहिम काळात 400 हून अधिक स्वच्छता-संबंधित उपक्रम हाती घेण्याचा विभागाचा मानस
Posted On:
14 SEP 2024 11:46AM by PIB Mumbai
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा 2024 (SHS 2024) मोहीम' साजरी केली जाणार आहे. ही मोहीम 'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' या संकल्पनेवर आधारित आहे. त्यानंतर, 22 ऑक्टोबर, 2024 रोजी ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा केला जाणार आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम या वर्षी ‘संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन’ या तत्वानुसार राबवण्यात येणार असून या मोहिमेत लोकसहभागावर आणि स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, यावर भर देण्यात येणार आहे. या मोहिमेत श्रमदान आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांव्यतिरिक्त, सफाई मित्र सुरक्षा शिबिरांचे आयोजन आणि निश्चित करण्यात आलेल्या स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) ची स्वच्छता करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ही स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) अनेकदा दुर्लक्षित कचरा कुंड्या असतात ज्या नियमित कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वच्छ करणे कठीण असते आणि हे युनिट्स पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी धोके निर्माण करतात. म्हणूनच कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे विशेष करून या युनिट्सना लक्ष्य केले जाणार आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) 2024 मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहे. विभागाने आपल्या अधीनस्थ, संलग्न, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) आणि देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांच्या सोबतीने 400 हून अधिक स्वच्छता-संबंधित उपक्रम हाती घेण्याचा मानस प्रदर्शित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये ‘स्वच्छता में जन भागीदारी’, सफाई मित्र सुरक्षा शिविर आणि निश्चित करण्यात आलेल्या स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) ची स्वच्छता अशा उपक्रमांचा समावेश असेल.
मुख्य उपक्रमांमध्ये स्वच्छता प्रतिज्ञा, घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम, एक पेड माँ के नाम, मानवी साखळी निर्मिती, सामूहिक स्वच्छता मोहीम, स्वच्छता चौपाल आणि स्वच्छता मित्रांसाठी शिविर यांचाही समावेश असेल.
सफाई मित्रावर विशेष लक्ष केंद्रित करून, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातर्फे सफाई मित्राच्या प्रभागांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तसेच स्वच्छता मित्रांसाठी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे.
***
H.Akude/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054890)
Visitor Counter : 51