गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद - 2024 चे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2024 8:15PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद - 2024 चे उद्घाटन केले.

उद्घाटनापूर्वी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी शहीदस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले आणि कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर शहीदांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेतील शिफारशींच्या डॅशबोर्डचे उदघाटन केले. राष्ट्रीय अपराध नोंद ब्युरो द्वारे हे डॅशबोर्ड विकसित करण्यात आले आहे.

दोन दिवसीय परिषदेत, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित उदयोन्मुख आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनेच्या शीर्ष नेतृत्वाबरोबर मार्गदर्शक आराखडा तयार केला जाणार आहे.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2054806)
आगंतुक पटल : 128