वस्त्रोद्योग मंत्रालय

बिगर-घरगुती वापराच्या फर्निचरमधील अग्निसुरक्षा वाढवण्याकरिता अनिवार्य दर्जा नियामक अटी

Posted On: 13 SEP 2024 3:20PM by PIB Mumbai

 

सार्वजनिक सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी, विशेषतः आगीशी संबंधित दुर्घटनांसदर्भात सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने बिगर-घरगुती फर्निचरमध्ये अग्निप्रतिबंधक अपहोल्स्ट्री फॅब्रिकचा वापर अनिवार्य केला आहे.

ऑक्टोबर 2023 पासून लागू असलेल्या, दर्जा नियंत्रण आदेश (QCO) नुसार आता सार्वजनिक ठिकाणी सर्व अपहोल्स्ट्री घटकांच्या वापरामध्ये भारतीय मानक ब्युरो विशेषतः  IS 15768:2008 चे अनुपालन आवश्यक आहे.

कार्यालये, मॉल्स, विमानतळ, रेस्टॉरंट, भुयारी शॉपिंग संकुले, संग्रहालये, रुग्णालये, प्रार्थनास्थळे आणि शैक्षणिक संस्था यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी बिगर-घरगुती फर्निचरमध्ये वापरले जाणारे अपहोल्स्टर्ड कॉम्पोझिट आणि फॅब्रिक यांना हा दर्जा नियंत्रण आदेश लागू होतो. 

सार्वजनिक वापराकरिता अपहोल्स्टर्ड फॅब्रिक असलेले संपूर्ण फर्निचर किंवा सब-ऍसेंब्ली यांच्या आयातीसंदर्भातही हा आदेश लागू आहे. मात्र, उद्योगांच्या विनंतीचा विचार करून 31 मार्च 2025 पर्यंत या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालयाने देखील उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाला IS 15768:2008चे फर्निचरसाठीच्या क्यूसीओमध्ये एकात्मिकरण करण्याची विनंती केली आहे. हे एकात्मिकरण फर्निचरसाठी सर्व संबंधित मानकांचा समावेश असलेली सर्वसमावेशक चौकट उपलब्ध होईल. या निर्णायक कृतीमधून सार्वजनिक स्थानांवरील अग्निसुरक्षेत वाढ करण्याची आणि  सर्व बिगर-घरगुती फर्निचर सर्व प्रकारच्या दर्जा मानकांची आणि सुरक्षेची पूर्तता करत असल्याचे सुनिश्चित करण्याची आणि अनेकांचे जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित होत आहे.

महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी क्यूसीओ हे सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत. बीआयएस प्रमाणीकरण अनेक उत्पादनांसाठी ऐच्छिक असताना, अग्निरोधक अपहोल्स्ट्री सारख्या धोरणात्मक वस्तूंसाठी या मानकांचे पालन करणे आता अनिवार्य आहे. हे नियमन सुरक्षित सार्वजनिक स्थाने निर्माण करण्यासाठी आणि या वातावरणात वापरलेले फर्निचर सर्वोच्च सुरक्षा मानकांची पूर्तता करते याची खातरजमा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

***

S.Kakade/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2054571) Visitor Counter : 21