कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शाश्वत हरित उपक्रमांवर भर देत एनएलसी इंडियाकडून आपले कॉर्पोरेट प्लॅन 2030 आणि व्हिजन 2047 या उपक्रमांना नव्याने चालना

Posted On: 13 SEP 2024 11:27AM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री, जी. किशन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाद्वारे, देशाने शाश्वत आणि अल्प-कार्बनच्या भविष्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. COP 26 मध्ये संकल्प केल्यानुसार भारत आपल्या विकास लक्ष्यांच्या दिशेने आगेकूच  करताना अल्प-कार्बन उत्सर्जन वाटचालीसाठी वचनबद्ध आहे. 2030 पर्यंत 500 गीगावॉट बिगर-जीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याचे राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. एक अग्रगण्य आणि जबाबदार केंद्रीय सार्वजनिक उपक्रम म्हणून, एनएलसी इंडिया लिमिटेड (NLCIL)ची ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता ही दुहेरी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 2030 पर्यंत तिच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेत तिप्पट वाढ करण्याची योजना आहे. एनएलसीआयएलची नवीकरणीय ऊर्जानिर्मितीची क्षमता 1.43 GW वरून 10.11 GW पर्यंत वाढवून, एकूण नियोजित क्षमतेच्या 50% नवीकरणीय ऊर्जा (RE) अशा प्रकारच्या मिश्र ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट आहे.

वरील योजनेत नवीकरणीय स्वरुपात 50,000 कोटी रुपये गुंतवणुकीची व्यवस्था आहे ज्यामुळे भारताच्या नवीकरणीय लक्ष्याला पाठबळ मिळेल आणि 2070 पर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य होईल. हे वाढीव लक्ष्य हवामानविषयक कृतीसाठी भारताचे योगदान आणि वचनबद्धता म्हणून COP 26 शिखर परिषदेत घोषित करण्यात आलेल्या सरकारच्या "पंचामृत" उपक्रमासोबत जुळणारे आहे.

 संपूर्णपणे एनएलसीआयएलची अनुदानित असलेली आणि नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर विशेष भर देण्यासाठी स्थापन झालेली ‘निगेल’(NLC India Green Energy Limited) कंपनी तिच्या इच्छित नवीकरणीय ऊर्जा कार्यक्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. सध्या 2 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा केंद्रांची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. स्पर्धात्मक बोली आणि हरित ऊर्जा क्षेत्रात उदयाला येणाऱ्या संधींची चाचपणी करण्यामध्ये सहभागी होऊन आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचे निगेलचे उद्दिष्ट आहे. या विस्तारामुळे भारताचे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल, ऊर्जा निर्मितीत विविधता येईल आणि कोळसा आयात कमी होईल. त्याशिवाय देशभरात संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा करणे सुनिश्चित करण्यासाठी मदत होईल. एनएलसीआयएलने आपल्या ऊर्जा निर्मिती कार्यक्षेत्रामध्ये  2030 मध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वाटा 50% वरून 2047 पर्यंत 77% पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामुळे कंपनीला 2070 पर्यंत निव्वळ शून्य(उत्सर्जन) गाठता येईल. 2030 नंतर खूप बदललेल्या ऊर्जा लँडस्केपसह, NLCIL नवीन थर्मल पॉवरची अपेक्षा करत नाही. क्षमता जोडणे. त्याऐवजी, विद्यमान थर्मल पॉवर स्टेशन्समधून उत्सर्जन कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम डोमेनमध्ये मार्गदर्शक कृती असेल. 2030 नंतर खूपच बदललेल्या ऊर्जा परिदृश्यासह, NLCIL नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची भर घालण्याच्या विचारात नाही. त्याऐवजी सध्या कार्यरत असलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील उत्सर्जन कमी करणे हेच या कंपनीच्या वाटचालीचे सूत्र असेल.

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054500) Visitor Counter : 47


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu