शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या उपस्थितीत क्युसीआय एनबीक्यूपी द्वारे आयोजित क्वालिटी समर फनकॅम्प 2024 च्या पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन

Posted On: 13 SEP 2024 11:13AM by PIB Mumbai

 

भारतीय गुणवत्ता परिषदे (क्युसीआय) अंतर्गत एनबीक्यूपी अर्थात राष्ट्रीय गुणवत्ता प्रोत्साहन मंडळाद्वारे 6 सप्टेंबर 2024 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित दुसऱ्या क्वालिटी समर फनकॅम्प अर्थात गुणवत्तापूर्ण ग्रीष्मकालीन मनोरंजनात्मक शिबिराच्या पुरस्कार वितरण सोहोळ्यास भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार उपस्थित होते. देशभरातील राज्य सरकारी अधिकारी, उद्योग धुरीण, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय कुमार यांनी अनुभवात्मक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की जेव्हा शालेय अभ्यासक्रमात अनुभवात्मक शिक्षण समाविष्ट केले जाते तेव्हा विद्यार्थी मनापासून शिकतात. त्यांना अध्ययनात रुची उत्पन्न होते जी आयुष्यभर टिकते आणि भविष्यातील अडथळ्यांवर मात करण्याकरिता अधिक चांगल्या प्रकारे सज्ज करते, असेही त्यांनी नमूद केले. भविष्यातील गुणवत्तापूर्ण ग्रीष्मकालीन मनोरंजनात्मक शिबिरात 10,00,000 विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे लक्ष्य त्यांनी दिले. शिक्षण, उद्योग आणि समाजाचे भविष्य घडवण्यासाठी गुणवत्तेच्या निर्णायक महत्त्वावर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भर दिला.

विद्यार्थ्यांनी दाखवलेली उर्मी आणि नवोन्मेष म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे असे आपल्या स्वागतपर भाषणात एनबीक्यूपी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. राज यांनी उद्धृत केले. तरुण हे गुणवत्तापूर्ण भारत मिशनचे मशाल वाहक असून समर फनकॅम्प सारख्या उपक्रमांद्वारे ते दर्जेदार राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी वाटचाल करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सेफ्टी स्टार्स: शायनींग ब्राईट विथ क्वालिटी” अर्थात गुणवत्ताधारित तेजोमय सुरक्षा तारक ही यावर्षीची संकल्पना होती. याद्वारे दैनंदिन जीवनात सुरक्षितता आणि गुणवत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होऊन भावी पिढीच्या युवा नेत्यांना ही मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रेरणा मिळाली. 15 एप्रिल ते 20 जुलै 2024 या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अन्न, वसतिस्थान, खेळणी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि शाश्वतता यासह विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तेची मूल्ये अंतर्भूत करून - भारताचे भविष्यातील निर्णय घेणाऱ्या मुलांची कल्पनाशक्ती जागृत करणे हे या ग्रीष्मकालीन शिबिराचे उद्दिष्ट होते. गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या तत्त्वांसह सर्जनशीलतेची जोड देणाऱ्या आकर्षक स्पर्धांच्या मालिकेद्वारे बालवाडी ते बारावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सक्षम करणारा हा उपक्रम आहे.

या वर्षीच्या स्पर्धांमध्ये भारतातील सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून 13,000 हून अधिक प्रवेशांसह सहभाग नोंदवला गेला आणि गुणवत्ता-धारित सुरक्षा उपाय जीवन आणि समुदाय सुधारण्यास कसे कारणीभूत ठरू शकतात, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. स्पर्धांमध्ये निबंध लेखन, रेखाचित्र स्पर्धा, लहान व्हिडिओ निर्मिती आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश होता; विद्यार्थ्यांना सुरक्षित, अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यात गुणवत्तेचे महत्त्व उमगण्यासाठी याची रचना करण्यात अली होती.

अभूतपूर्व सहभाग आणि प्रगल्भ प्रतिभाविष्कारासह क्वालिटी समर फनकॅम्प 2024 ने भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ म्हणून गुणवत्तेचे महत्त्व पुन्हा एकदा बळकट केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, सहभागींना आठवण करून दिली गेली की त्यांचा “सेफ्टी स्टार्स” (सुरक्षा तारक) म्हणून प्रवास नुकताच सुरू झाला आहे आणि त्यांनी पुढे नेलेल्या गुणवत्तेची मूल्ये नाविन्यता आणि उत्कृष्टतेमध्ये जागतिक अग्रणी बनण्याच्या भारताच्या मार्गाला आकार देतील.

***

S.Pophlale/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054464) Visitor Counter : 67


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil