सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाद्वारे उद्यम सर्वेक्षणांवर परिषदेचे आयोजन

Posted On: 11 SEP 2024 7:23PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय 12 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे उद्यम  सर्वेक्षणांवर एका परिषदेचे आयोजन करण्यासाठी सज्ज  आहे. हा कार्यक्रम विविध व्यावसायिक संघटना आणि हितधारकांसोबत भारताच्या आर्थिक आणि व्यावसायिक परिदृश्याच्या  आकलनाला आकार देणाऱ्या आगामी सर्वेक्षणांवर चर्चा करण्याच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या परिषदेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या चार प्रमुख उद्यम सर्वेक्षणांवर-  उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसआय)स्वतंत्र कंपनी म्हणून स्थापना न झालेल्या कंपन्यांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसयुएसई ), सेवा क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसएसएसई ), भांडवली खर्च (कॅपेक्स ) सर्वेक्षण आणि आर्थिक जनगणना यांवर लक्ष केंद्रित केले जाईल .

एएसआय, एएसयुएसई आणि एएसएसएसई या सर्वेक्षणांची रचना वार्षिक आधारावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या बिगर-कृषी क्षेत्राचे सर्वसमावेशक चित्र प्रदान करण्याच्या दृष्टीने केली असून राष्ट्रीय लेखा सांख्यिकीत  जीडीपी आणि एसडीपी आकडे संकलित करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून काम करतील.  खाजगी क्षेत्रातील कॅपेक्स गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवरील दूरदर्शी  सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मागील वर्षातील कॅपेक्स गुंतवणुकीची माहिती संकलित करणे, पुढील दोन वर्षांमधील अंदाजित कॅपेक्स गुंतवणूक आणि मालमत्तेच्या प्रकारानुसार कॅपेक्स गुंतवणुकीचे विभाजन करणे हे आहे. हे सर्वेक्षण विविध केंद्र आणि राज्य मंत्रालयांना क्षेत्र-निहाय विश्लेषण आणि धोरण आखणीत मदत करेल.

तसेच आर्थिक जनगणनेमुळे औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रातील आस्थापनांची एकूण संख्या आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या उपलब्ध होते . या व्यतिरिक्त, आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, मालकीचे स्वरूप , क्रियान्वयनाचे  स्वरूप इत्यादीसारखे काही इतर महत्वपूर्ण  मापदंड देखील या जनगणनेमध्ये समाविष्ट केले  आहेत. देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये स्थित  प्रत्येक कुटुंबाशी घरोघरी  जाऊन तसेच आस्थापनांशी संपर्क साधून डेटा संकलन केले जाते.

ही परिषद आर्थिक डेटाचा दर्जा  आणि प्रासंगिकता वाढवण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्यात्मक  प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते.व्यावसायिक संघटनांशी थेट संपर्क साधून, अधिक अचूक आणि प्रभावी डेटा संकलन सुनिश्चित करून, व्यावसायिक समुदायाशी सकारात्मक संबंध निर्माण करणे  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचे उद्दिष्ट आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सर्वेक्षणांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया www.mospi.gov.in  या वेबसाइटला भेट द्या.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2053986) Visitor Counter : 49


Read this release in: English , Urdu , Hindi