संरक्षण मंत्रालय
सीमावर्ती गावे ही देशातील पहिली गावे आहेत, दुर्गम भाग नव्हे ; त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे-संरक्षण मंत्री
"सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक प्रगती सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे"
सीमावर्ती भागात नागरी-लष्करी सहकार्यामुळे स्थलांतरित झालेले लोक मूळ गावी परत येत आहेत : राजनाथ सिंह
Posted On:
11 SEP 2024 5:21PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासाप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पूर्ण वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि ती गावे देशातील पहिली गावे आहेत,दुर्गम भाग नाही असे नमूद केले. 11 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील सीमा क्षेत्र विकास परिषदेला संबोधित करताना, संरक्षणमंत्र्यांनी निदर्शनास आणले की भारताचे भौगोलिक-सामरिक स्थान असे आहे की त्यामुळे विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यांचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग सीमा क्षेत्र विकास सुनिश्चित करणे हा आहे.
गेल्या 10 वर्षात सीमा क्षेत्राच्या विकासात झालेली प्रगती अधोरेखित करत राजनाथ सिंह म्हणाले: “सीमा रस्ते संघटनेने 8,500 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते आणि 400 हून अधिक कायमस्वरूपी पूल बांधले आहेत. अटल बोगदा, सेला बोगदा आणि शिकुन-ला बोगदा, जो जगातील सर्वात उंच बोगदा ठरणार आहे, हे सीमावर्ती भागाच्या विकासात मैलाचे दगड ठरतील. आमच्या सरकारने लडाखच्या सीमावर्ती भागांना राष्ट्रीय विद्युत ग्रीडशी जोडण्यासाठी 220 किलो-व्होल्टची श्रीनगर-लेह विद्युत लाईन सुरू केली आहे. याशिवाय, ईशान्येकडील राज्यांमधील पारेषण आणि वितरण संबंधी पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. भारत-नेट ब्रॉडबँड प्रकल्पाद्वारे 1,500 हून अधिक गावांमध्ये अति-जलद इंटरनेट सुविधा पुरवण्यात आली आहे. केवळ गेल्या चार वर्षांत, 7,000 हून अधिक सीमावर्ती गावे इंटरनेट कनेक्शनने जोडली गेली आहेत आणि आमचा भर लडाख आणि अरुणाचल प्रदेशवर आहे.”
या प्रसंगी बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सीमा क्षेत्र विकास हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रमुख घटक असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या प्रयत्नांमुळे सीमावर्ती भागात आदर्श गावे, सीमा पर्यटन आणि वैद्यकीय सहाय्य आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यांसह पायाभूत सुविधांचा विकास करण्यात मोठा हातभार लागला आहे. सीमा क्षेत्र विकासाचा दृष्टीकोन धाडसी, महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशकता, शाश्वतता आणि सुरक्षेच्या तत्त्वांमध्ये खोलवर रुजलेला आहे असे सांगून ते म्हणाले की, नव्या ऊर्जेसह ‘संपूर्ण राष्ट्राचा दृष्टिकोन’ तयार करण्यात आला आहे.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053826)
Visitor Counter : 105