संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उद्या 100 दिवसातल्या कामगिरींचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय ई-विधान ॲप 2.0, अधीनस्थ कायदे, सल्लागार समिती, एनवायपीएस पोर्टल आणि एकलव्य आदर्श निवासी शाळा (EMRS) यांच्याशी संबंधित सहा उपक्रम आणि पोर्टलचे करणार उद्घाटन
Posted On:
10 SEP 2024 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2024
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या 100 दिवसातल्या कामगिरींचा एक भाग म्हणून विविध उपक्रम आणि पोर्टलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या, 11 सप्टेंबर, 2024 रोजी संसद भवन, नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू खालील सहा उपक्रम आणि पोर्टलचे उद्घाटन करतील:
1. राष्ट्रीय ई-विधान ॲप - NeVA 2.0
2. NeVA मोबाइल ॲप आवृत्ती 2.0
3. अधीनस्थ कायदे व्यवस्थापन प्रणाली (SLMS)
4. सल्लागार समिती व्यवस्थापन प्रणाली (CCMS)
5. एनवायपीएस पोर्टल 2.0
6. एकलव्य आदर्श निवासी शाळा (EMRS)
NeVA 2.0 ची अद्यतनीकरण केलेली आवृत्ती अनेक प्रगत वैशिष्ट्ये सादर करते, ज्यामध्ये अधिक वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आणि राज्य विधीमंडळांच्या कायदेशीर प्रक्रियांसह वर्धित एकीकरण समाविष्ट आहे. NeVA 2.0 च्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये या बाबी समाविष्ट आहेत :
अनु.क्र.
|
वैशिष्ट्य
|
1
|
NeVA मोबाइल ॲप आवृत्ती 2.0 चे रिडीझाईन
|
2
|
बायो प्रोफाइल असलेले मान्यवर
|
3
|
आजच्या, मागील आणि आगामी घटनांबाबत विषयपत्रिका
|
4
|
सूचना फलक
|
5
|
सूचना, प्रश्न, बिले, समिती अहवाल आणि सदस्यांसाठी डॅशबोर्ड
|
6
|
सार्वजनिक वापरकर्त्यांद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा
|
7
|
सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांना दिलेला प्रतिसाद
|
8
|
बातम्या सामायिक करणारे वैशिष्ट्य (व्हाट्सअप, फेसबुक आणि एक्स)
|
9
|
अलीकडील उपक्रमांसह सदस्य डॅशबोर्ड
|
NeVA 2.0 मध्ये झालेल्या अद्यतनीकरणामुळे कागदविरहित कायदेशीर वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच रीअल-टाइम प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी सॉफ्टवेअर आणखी सक्षम बनेल.
याशिवाय, लोकसभेच्या अधीनस्थ कायदेविषयक समितीच्या (COSL) 28 व्या अहवालातील शिफारशीच्या आधारे, या मंत्रालयाने एक पोर्टल विकसित केले आहे, जे चार भागधारकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी एकल विंडो इंटरफेस प्रदान करेल, ते चार भागधारक म्हणजे i) भारत सरकारच्या अखत्यारीतील येणारी सर्व मंत्रालये आणि विभाग ii) कॅबिनेट सचिवालय (iii) कायदे विभाग आणि iv) संसदीय कामकाज मंत्रालय. या उपक्रमामुळे विविध कायद्यांतर्गत अधिक चांगले निर्णय घेणे आणि अधीनस्थ कायदे लवकरात लवकर तयार करणे शक्य होईल.
सल्लागार समिती व्यवस्थापन प्रणाली (CCMS) शी संबंधित पोर्टलची कल्पना केली गेली आहे आणि सल्लागार समितीच्या तीन भागधारकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हे पोर्टल आरेखीत केले गेले आहे. ते 3 भागधारक म्हणजे i) संसद सदस्य ii) भारत सरकारची मंत्रालये iii) संसदीय कामकाज मंत्रालय. या पोर्टलच्या साहाय्याने, समित्यांची सर्व माहिती आणि कागदपत्रे संबंधित सदस्य किंवा मंत्रालयाला रिअल टाइम आधारावर उपलब्ध होतील आणि त्याद्वारे सर्वांना माहिती मिळणे सुनिश्चित होऊन हे सर्व जण डिजिटल पद्धतीने एकमेकांशी संवाद साधू शकतील.
एनवायपीएस पोर्टल 2.0 मंत्रालयाने विकसित केले आहे जेणेकरून मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबतच देशातील सर्व नागरिकांना हे पोर्टल उघडून पोर्टलमधील सहभागाची संख्या झपाट्याने वाढवता येईल. आता, या योजनेत संस्था सहभाग, गट सहभाग आणि वैयक्तिक सहभागाद्वारे देखील सहभागी होता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये लोकशाही आचारसंहिता आणि मूल्यांचा प्रसार होण्यास मदत होईल आणि त्याची व्याप्ती अनेक पटींनी वाढेल.
त्याचप्रमाणे, मंत्रालय एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या (EMRSs) विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा एक नवीन उपक्रम देखील सुरू करत आहे. लोकशाहीची मुळे मजबूत करणे, भिन्न विचारांप्रती सहिष्णुता विकसित करणे, शिस्तीच्या निरोगी सवयी लावणे आणि एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये दरवर्षी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा आयोजित करून आदिवासी विद्यार्थ्यांना संसद आणि संसदीय संस्थांच्या कामकाजाची ओळख करून देणे, हे या उपक्रमाचे ध्येय आणि उद्दिष्टे आहेत.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053596)
Visitor Counter : 58