सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय 9 आणि 10 सप्टेंबर 2024 रोजी आग्रा येथे राष्ट्रीय समीक्षा परिषद "चिंतन शिविर" करणार आयोजित
मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "दृष्टिकोन 2047" ची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा विकसित करणे हे या चिंतन शिबिराचे उद्दिष्ट
Posted On:
08 SEP 2024 8:05PM by PIB Mumbai
8 ऑगस्ट 2024: भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, 9 आणि 10 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे "चिंतन शिविर" नावाची दोन दिवसीय राष्ट्रीय समिक्षा परिषद आयोजित करणार आहे.
या महत्त्वपूर्ण परिषदेव्दारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सामाजिक न्याय आणि समाज कल्याण विभागांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि इतर प्रमुख भागधारकांना एकत्र आणून देशभरातील उपेक्षित समुदायांच्या उत्थानाच्या उद्देशाने विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे या "चिंतन शिविर" चे अध्यक्षपद भूषवणार असून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री बी. एल वर्मा आणि रामदास आठवले तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या चिंतन शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
मुख्य सामाजिक न्याय योजनांच्या प्रगतीचा तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावर त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे शिबिर केंद्र आणि राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये अखंड समन्वय सुनिश्चित करण्याचा आणि प्रभावी अंमलबजावणी दरम्यान समोर येणारी आव्हाने आणि त्यावरील उपायांवर चर्चा घडवून आणणार आहे.
हे चिंतन शिबिर विविध भागधारकांमधील संवाद आणि सहकार्याला चालना देणारे व्यासपीठ आहे. दोन दिवसांच्या या शिबिरामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्वोत्तम पद्धती आणि दृष्टिकोन सामायिक करता येतील आणि सोबतच योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करता येतील. संवादात्मक सत्रे आणि चर्चां याद्वारे ही परिषद भविष्यातील सामाजिक सक्षमीकरण उपक्रमांसाठी पथदर्शी आराखडा प्रदान करेल तसेच या उपक्रमाची व्याप्ती आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी धोरणे तयार करेल.
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053023)
Visitor Counter : 55