पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह बिहारमध्ये येत्या 10 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या सामाजिक न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायती या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान भुषवणार

Posted On: 08 SEP 2024 3:17PM by PIB Mumbai

 

बिहारमध्ये पाटणा इथल्या ज्ञान भवनातील सम्राट अशोक परिषद केंद्रात  येत्या 10 सप्टेंबर 2024 पासून, सामाजिक न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायती या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले आहे. या परिषदेत येत्या 10 सप्टेंबर 2024 ला होणार असलेल्या उद्घाटनीय सत्राचे अध्यक्षस्थान  केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह भूषणवणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते येत्या 10 सप्टेंबर 2024 ला सामाजिक न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायती या विषयावरील या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे  उद्घाटन होईल. 

शाश्वत विकासा अंतर्गतच्या 17 ध्येय उद्दिष्टांचे, पंचायतींच्य्या माध्यमातून समाजाच्या तळागाळाशी सर्वाधिक संबंधित असलेल्या शाश्वत विकासाच्या  9 स्थानिक ध्येय उद्दिष्टांच्या संकल्पनेअंतर्गत परिवर्तन करत आणून  शाश्वत विकासाची ध्येय उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या पंचायतीराज मंत्रालयाने आखलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली जात आहे.

ही कार्यशाळा प्रामुख्याने या परिवर्तित शाश्वत विकासाच्या स्थानिकीकरण केलेल्या 9 ध्येय उद्दिष्ट संकल्पनांपैकी सामाजिक न्याय्य आणि सामाजिक दृष्ट्या सुरक्षित पंचायती या 7 व्या संकल्पनेवर आधारलेली आहे. शाश्वत विकासांच्या ध्येय उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाच्या या संकल्पनेअंतर्गत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कल्याणावर भर देत गावांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यावर भर दिला गेला आहे.

अनुसूचित जाती - जमाती, दिव्यांग व्यक्ती, वृद्ध, महिला, मुले, संकटग्रस्त स्थलांतरित, तृतीयपंथी अशा समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी योजनांची आखणी करणे आणि संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे हे ग्राम पंचायतींचे घटनात्मक कार्यच आहे. अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्याच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणे, बाल आणि महिला कुपोषणाच्या तसेच मृत्यू दरात घट साध्य करणे, वृद्धांसाठीच्या शारीरिक आरोग्यविषयक सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे, मुलांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सहकार्यात सुधारणा घडवून आणणे, महिला आणि बालकांवरील हिंसाचाराच्या घटना रोखणे, ग्रामीण उपजीविकेच्या स्रोतांमध्ये सुधारणा घडवून आणणे, दिव्यांग व्यक्तींकरता उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणे, घरे तसेच इतर किमान आवश्यक मूलभूत सेवा उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करणे, समाजातील सर्व पात्र घटकांना निवृत्ती वेतनासारख्या सामाजिक सुरक्षेविषयक योजनांच्या सेवा उपलब्ध होतील हे पाहणे, तसेच समाजातील तृतीयपंथीयांसह इतर विशेष प्रवर्गांचे समाजातील सर्वसमावेशन आणि त्यांच्यासाठीच्या विशेष सेवा सुविधांचा प्रचार प्रसार अशा व्यापक विषयांवर या कार्यशाळेत चर्चा केली जाणार आहे.

***

G.Chippalkatti/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2052951) Visitor Counter : 46


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil