संरक्षण मंत्रालय
एकात्मित संरक्षण मुख्यालयाने सशस्त्र दलाच्या तिन्ही दिलांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी केले संयुक्त कार्य मूल्यमापन आणि आढाव्याचे आयोजन
Posted On:
08 SEP 2024 2:07PM by PIB Mumbai
9 ते 13 सप्टेंबर या कालावधीत नवी दिल्लीतील भारतीय एकात्मिक सेवा संस्थेत तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी संयुक्त कार्य मूल्यमापन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा पाच दिवसांचा विकासाधारीत अभिमुखता उपक्रम असून, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांमधील मेजर जनरल आणि समकक्ष अधिकाऱ्यांसाठी या कार्यक्रमाची आखणी केली गेली आहे.
भारतीय सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सामरिक नियोजन, योग्य अंदाज बांधण्याचे कौशकल्य तसेच भविष्यातील धोके, आव्हाने आणि संघर्षांच्यादृष्टीने तयारी करण्याचे कौशल्य विकसित करून, त्यांना भविष्यात नेतृत्वाच्या भूमिकांसाठी पार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यासाठी संयुक्त कार्यान्वयीन आढावा आणि मूल्यमापन (CCORE) या संकल्पनात्मक उपक्रमाची आणखी केली गेली आहे. लष्करी नेतृत्व, लढाऊ सहकारी (मानवी - तसेच उपकरणीय ) आणि सहाय्यक कर्मचारी या तीन महत्त्वच्या घटकांवरच भविष्यात युद्धांना प्रभावीपणे सामोरे जाण्याचे नियोजन अवलंबून असणार आहे. त्यालाच अनुसरून भारतीय सशस्त्र दल संकल्पना आणि आवश्यक सूचीबद्धता या दोन्ही पातळ्यावर आधुनिकीकरण घडवून आणण्याच्या दिशेने बहुआयामी पावले उचलत आहे. त्यामुळे भविष्यातील वरिष्ठ लष्करी नेतृत्वाने त्या त्या वेळी बदलत्या भू - राजकीय बहुआयामी परिस्थितीशी तसेच विध्वंसाला कारणीभूत ठरू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रगतीमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीशी जुळवून घेत सर्वंकष निर्णय घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.
भारतीय सशस्त्र दलाच्या सर्व दलांमध्ये कार्यावन्यीन परिसंस्थेविषयी सखोल आकलन निर्माण करण्याच्या हेतूने, त्यांच्या संयुक्तपणे तसेच एकात्मिक भावनेने काम करण्याच्या वृत्तीला चालना देणे, आणि त्याद्वारे त्यांच्यातील परस्पर सहकार्य आणि समन्वयाची पातळी उंचावणे हे देखील संयुक्त कार्यान्वयीन आढावा आणि मूल्यमापन (CCORE) या उपक्रमाचे एक मुख्य उद्दीष्ट आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रांमधील 30 मान्यवर वक्ते आणि विषय तज्ज्ञांचे परिसंवाद आणि व्याख्यानांचे आयोजन केले गेले आहे. युद्धांचे बदलते स्वरूप, जागतिकीकरण आणि परस्पर संबंध, जगभरातील अलीकडच्या काळात सुरू असलेल्या संघर्षांतून मिळालेली शिकवण, सुरू असलेल्या बिगर - गतिजन्य युद्धांचा प्रभाव, सायबर आणि माहितीविषयक युद्ध तसेच लष्करी यंत्रणेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलीत प्रणालींचा अवलंब अशा काही महत्वाच्या विषयांवरही या उपक्रमाअंतर्गत चर्चा केली जाणार आहे.
***
G.Chippalkatti/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052942)
Visitor Counter : 78