कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ल्ड स्किल्स 2024’  : टीम इंडियाची 60 सदस्यांची  तुकडी फ्रान्समधील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी ल्यों येथे दाखल


‘वर्ल्ड स्किल्स 2024’ मध्‍ये भारताचे 60 स्पर्धक 52 कौशल्यांमध्ये सहभागी होणार;  या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत  70 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांच्या चमूंचा सहभाग

फ्रान्समधल्या लियॉ येथे युरोएक्स्पोमध्‍ये  10 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणार स्‍पर्धा; एकूण  1,300 तज्ञांसह 1,400 स्पर्धक होणार सहभागी

Posted On: 07 SEP 2024 8:23PM by PIB Mumbai

 

व्दैवार्षिक वर्ल्ड स्किल 2024 ची 47 वी आवृत्ती सुरू होणार आहे.  या आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी  भारतीय संघाची 60 सदस्यांची  युवा तुकडी फ्रान्समधील लियॉ या शहरामध्‍ये आज  दाखल झाली.  सर्वात  मोठ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय चमू सज्ज झाला आहे.

आज, शनिवार, 7 सप्टेंबरला  लियॉ मध्ये वर्ल्डस्किल्स 2024 स्पर्धेतील  कौशल्य व्यवस्थापन योजनेत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, स्पर्धात्मक तयारी करण्यात आली. निष्पक्ष आणि प्रमाणित स्पर्धा वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ‘वर्कस्टेशन्स’ उभारणे, साधने आणि उपकरणांची अंतीम तयारी  करणे आणि तांत्रिक वैशिष्ट्ये संरेखित करण्यात विविध कौशल्यांचे तज्ञ आणि सर्व स्पर्धेक आज  गुंतले होते.

या स्‍पर्धेत सहभागी होणा-या भारतीय  कुशल व्यक्ती वेगवेगळ्या 52 कौशल्य श्रेणींमध्ये 70 हून अधिक देशांतील सर्वोत्तम लोकांशी स्पर्धा करतील. आंतरराष्ट्रीय स्पर्धा 10-15 सप्टेंबर 2024 दरम्यान फ्रान्स येथे लियॉ  युरोएक्स्पो मध्‍ये  सुरू होणार आहे, ज्यामध्ये 1,400 स्पर्धक आणि 1,300 तज्ञ सहभागी होतील. कौशल्याचे ‘ ऑलिम्पिक’ मानले जात असलेल्या या भव्य कार्यक्रमात 2.5 लाखांहून अधिकजण सहभागी  होतीलअशी अपेक्षा आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि शिक्षण राज्यमंत्री  जयंत चौधरी, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान, ते जागतिक स्तरावर कौशल्यांवरील संवाद पुढे नेण्यासाठी भागीदार देशांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतील.

या स्‍पर्धेत 52 हून अधिक ‘वर्ल्डस्किल’  तज्ञ आणि 100 पेक्षा जास्‍त  उद्योग आणि शैक्षणिक भागीदारांचे प्रशिक्षण समर्थन, वर्ल्डस्किल्स लियॉ  येथे त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात मोठ्या गटांपैकी एक असलेला भारतीय चमू  सध्‍या  प्रशिक्षण आणि तयारी करण्यात गुंतला  आहे.

स्पर्धकांनी टोयोटा किर्लोस्कर, मारुती, लिंकन इलेक्ट्रिक आणि इतर बऱ्याच आघाडीच्या कंपन्यांद्वारे समर्थित कठोर प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडले, ज्यात पुढील प्रशिक्षण देशभरातील विविध उद्योग प्रमुख आणि संस्थांच्या कौशल्याने समृद्ध केले – फेस्‍टो इंडिया इन इंडस्‍ट्री  4.0 पासून एनआयएफटी  दिल्ली पर्यंत फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आणि एल अँड टी ने विटांच्‍या रचनेपासून ते काँक्रीट बांधकामापर्यंत कौशल्य प्रशिक्षण दिले आहे.

या वर्षी वेल्डिंग, प्लंबिंग आणि हीटिंग यासारख्या पारंपरिक पुरुष-प्रधान क्षेत्रांमध्ये महिलांचाही स्पर्धेत महत्त्वपूर्ण  सहभाग आहे. अगदी मिझोराम ते जम्मू आणि काश्मीर, उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम आणि अगदी अंदमान आणि निकोबार व्दीप समूहांसह  प्रत्येक प्रदेशातील कुशल व्यक्तींचा  भारतीय चमूमध्‍ये समावेश्‍स आहे. यामुळे भारतीय संघामध्‍ये अतुलनीय विविधता प्रतिबिंबित होते.

या स्‍पर्धेत सहभागी होणा-या भारताच्या तुकडीने प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा पार केला. यामध्ये 1-3 सप्टेंबर 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे योग सत्र, मानसिक शक्ती सुधारण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या, पौष्टिक आहार सल्ला आणि इतर विविध मार्गदर्शनांचा समावेश होता.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2052855) Visitor Counter : 65


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu