रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्‍वे संरक्षण दलाच्या महासंचालकांच्या नेतृत्‍वाखाली  लडाखच्या  हॉट स्प्रिंग्स स्‍मृतिस्‍थळावर पोलीस शहीदांना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 07 SEP 2024 4:42PM by PIB Mumbai

 

रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक  मनोज यादव यांनी 28 सदस्यीय शिष्टमंडळासह 3 सप्टेंबर 2024 रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग स्‍मृतिस्‍थळ  येथे पोलीस शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ही भेट आयटीबीपी, आयटीबीएम चे  शूर अधिकारी आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ससाण्यासारखी  नजर ठेवून दक्ष आहेत, अशा जवानांच्या एकतेच्या प्रदर्शनासाठी होती.

यावेळी डीजी यादव यांनी विविध राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे (सीएपीएफ) प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या 28 सदस्यांच्या  शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. तर तेलंगणा पोलिस विभागाचे डीआयजी एन. प्रकाश रेड्डीया गटाचे उपनेते होते. डीसीपी/ईओडब्‍ल्‍यू राजा बंठिया यांनी पोलिस शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व केले.

हे स्मारक भारतीय पोलीस दलांसाठी एक पवित्र स्थळ मानले जाते.  या स्‍थानी  21 ऑक्टोबर 1959 रोजी राष्ट्राचे रक्षण करताना दहा सीआरपीएफ अधिकारी/कर्मचाऱ्यांनी  प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांच्‍या स्‍मरणार्थ  1960 पासून दरवर्षी श्रद्धांजली वाहिली जाते.  देशभरातील पोलीस अधिकारी, सेवा आणि सेवानिवृत्त यांच्यासाठी ही एक अत्यंत आदरणीय परंपरा आहे. हे स्‍थान  पूर्व लडाखमधील वास्‍तविक  नियंत्रण रेषेजवळ (एलएसी ) समुद्रसपाटीपासून 15,400 फूट उंचीवर. असलेल्या खडबडीत, डोंगराळ  आणि दुर्गम भागात आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैन्याविरुद्ध शौर्याने उभे राहिलेल्या गस्ती पथकाचे सदस्य, 86 वर्षीय वयोवृध्‍द सोनम दोरजे यांना भेटण्याचा मान पोलिस शिष्टमंडळाला मिळाला.  या स्‍थानावरच  त्यांनी शत्रू पक्षाला रोखून धरले होते.   त्यांनी दाखवलेले धाडस  आणि प्रचंड धैर्य  म्हणजे इतिहासातील  एक प्रेरणादायी अध्याय आहे.

या स्‍मृतिस्‍थळाला भेट देणारे डीजी  मनोज यादव हे  प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणारे रेल्वे संरक्षण दलाचे पहिले  अधिकारी आहेत.  विविध दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह त्यांचा सहभाग भारतातील विविध पोलीस दलांमध्ये सामायिक एकता, सामर्थ्य आणि सौहार्द अधिक मजबूत करतो.

1958 मध्ये दलाच्या स्थापनेपासून कर्तव्य बजावताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाच्या 1011 शूर जवानांना श्रध्‍दांजली अर्पण करताना, डीजी यादव म्हणाले, ‘ आरपीएफ यांनी शूर जवानांनी बजावलेले  कर्तव्य, दाखवलेले  शौर्य आणि केलेले बलिदान या  भावनेशी आरपीएफच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पोलीस दलाच्या  इतिहासामध्‍ये   1959 च्या बलिदानाविषयी  अनेक जवानांच्या मनात आठवणी  कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत.’

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2052844) Visitor Counter : 84


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu