संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण सहकार्यासाठी संयुक्त समितीची सहावी बैठक

Posted On: 05 SEP 2024 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण सहकार्यासाठी संयुक्त समितीची सहावी बैठक सौदी अरेबियामध्ये रियाध इथे 4 सप्टेंबर 2024 रोजी झाली.दोन देशांमधील दीर्घ काळापासून असलेले बहुआयामी संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या नव्या पर्यायांवर बैठकीत चर्चा झाली.सहयोग आणि सहकार्याची व्याप्ती लष्कर, प्रशिक्षण, संरक्षण उद्योग, संशोधन आणि विकास इ.क्षेत्रात वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात शतकानुशतके जुन्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक बंधावर आधारित सौहार्दपूर्ण मैत्रीचे संबंध आहेत. संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची स्थापना सामंजस्य करारांतर्गत संरक्षण सहकार्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

बैठकीत संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले.बैठकीच्या संयुक्त अध्यक्षस्थानी सौदी अरेबियाच्या शिष्टमंडळाचे मेजर जनरल सलमान बिन अवध अल्-हर्बी होते.

 

 

 
S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2052352) Visitor Counter : 41


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil