संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेश येथे नौदलाकडून मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्य


आधुनिक हलक्या हेलिकॉप्टर (एएलएच) द्वारे अडकलेल्या 22 जणांची सुटका

Posted On: 03 SEP 2024 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2024

 

आंध्र प्रदेशातील संततधार पावसानंतर उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या विनंत्यांवर आधारित, भारतीय नौदल विमाने, पूर निवारण सहाय्यता पथके (एफआरटी) आणि विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडची पाणबुडी  पथके राज्यातील मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रयत्नात (एचएडीआर) वाढ करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. 

शोध आणि बचाव (एसएआर) कार्यासाठी चार हेलिकॉप्टर (02 एएलएच आणि 02 चेतक) आणि एक डॉर्नियर विमान तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत अडकलेल्या 22 जणांची सुटका करण्यात आली आहे आणि अडकलेल्या व्यक्तींसाठी 1000 किलो पेक्षा जास्त अन्न विमानातून खाली सोडण्यात आले आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी 10 एफआरटी देखील तैनात करण्यात आली आहेत.

आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी अतिरिक्त आणि संबंधित सामग्रीसह राखीव बचाव पथके सज्ज  ठेवण्यात आली आहेत.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051309) Visitor Counter : 35


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil