उपराष्ट्रपती कार्यालय
"एकेकाळी सत्तेत असलेले लोक आता राष्ट्रविरोधी वक्तव्ये करत असून आपल्या लोकशाहीला आव्हान देत आहेत" - उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
Posted On:
31 AUG 2024 6:42PM by PIB Mumbai
एकेकाळी सत्तेत असलेले लोक आता राष्ट्रविरोधी वक्तव्ये करत असून आपल्या लोकशाहीला आव्हान देत आहेत, असे म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चिंता व्यक्त केली. “आपल्या स्वार्थी राजकीय फायद्यांसाठी ते राष्ट्रविरोधी वक्तव्ये करतात आणि आपल्या महान लोकशाहीची तुलना शेजारच्या राष्ट्रांच्या व्यवस्थेशी करतात”, असेही ते म्हणाले.
आज देहरादूनमध्ये सीएसआयआर-आयआयपी येथे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संबोधित करताना धनखड यांनी मानवतेसमोर असलेल्या हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या तातडीच्या आव्हानांचा उल्लेख केला.
हवामान विषयक न्यायाच्या गरजेवर भर देताना धनखड म्हणाले, “हवामानातील बदल हा असुरक्षित असलेल्या लोकांना जास्त प्रभावित करतो आणि त्यामुळे हवामान विषयक न्याय हा आपला मार्गदर्शक सिद्धांत असावा”.
भारताच्या आर्थिक वाढीचा मागोवा घेताना ते म्हणाले, “एकेकाळी ठिसूळ अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भरारी घेतली आहे आणि 2030 सालापर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे. भारताची आर्थिक प्रगती ही शाश्वत विकासाशी सुसंगत आहे; जी भविष्यातील पिढ्यांसाठी अभिमानास्पद वारसा सुनिश्चित करते.”
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
O
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050534)
Visitor Counter : 60