सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी ग्रामोद्योग आयोगाची या क्षेत्रातील कामगिरी आणि खादी महोत्सव, 2024 यानिमित्ताने त्यांच्या तयारीचा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग  मंत्री श्री जीतन राम मांझी यांनी घेतला आढावा

Posted On: 31 AUG 2024 10:31AM by PIB Mumbai

 

मंत्री, श्री जीतन राम मांझी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय  राज्यमंत्री, श्रीमती शोभा करंदलाजे यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची या  क्षेत्रातील कामगिरी आणि खादी ग्रामोद्योग आयोगाद्वारे (KVIC) ऑक्टोबर, 2024 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या खादी महोत्सव, 2024 याविषयी  आढावा बैठक घेतली.या बैठकीत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष श्री मनोज कुमार यांच्यासह , एमएसएमई सचिव, एमएसएमई सहसचिव (ARI), केव्हीआयसीचे कार्यकारी अधिकारी, तसेच आणि एमएसएमई मंत्रालयातील आणि केव्हीआयसीचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

देशभरात खादीचा व्यापक प्रचार आणि प्रचार करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवून लोकांना खादीचे कापड परिधान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीमध्ये योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीत भर दिला.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050372) Visitor Counter : 20