कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
9 अर्जांचे एकाच अर्जात विलीनीकरण: ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या स्वरुपातील एकल एकीकृत निवृत्तीवेतन अर्ज केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला जारी
Posted On:
30 AUG 2024 4:23PM by PIB Mumbai
देशभरातील ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्तीवेतनधारकांचे राहणीमान सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, निवृत्ती धारकांना नऊ वेगळे अर्ज एकत्र करून भरण्याऐवजी एकच एकीकृत अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज यांनी केली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय प्रक्रिया सुलभ करण्याच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करतो, ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाचवून त्यांची ऊर्जा आणि कौशल्य जतन करून "विकसित भारतच्या उद्दिष्टांत त्यांना प्रभावीपणे योगदान देता येईल.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह या सुधारणेचे महत्त्व सांगत म्हणाले की, "'एकल सुलभीकृत निवृत्तीवेतन अर्ज आणि ई-एचआरएमएस' समवेत भविष्य चे डिजिटल एकीकरणाचा आरंभ हा निवृत्तीवेतन विभागाने गाठलेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा आहे, हे केवळ सोयीसाठी नाही; तर आमच्या वडिलाधाऱ्यांच्या वेळेचा आणि अनुभवाचा आदर करणे आणि ते सन्मानाने , त्रासमुक्त जीवन जगू शकतील याची खात्री करणे, यादृष्टीने निवृत्तीवेतन विभागाच्या मुकुटातील हा एक मानाचा तुरा आहे.

तपशिलांचे स्पष्टीकरण देताना मंत्री म्हणाले “ई-एचआरएमएसवर असलेले आणि सेवानिवृत्त होणारे अधिकारी हे ई-एचआरएमएस द्वारे (केवळ सेवानिवृत्ती प्रकरणे) फॉर्म 6-ए हा एकच अर्ज भरतील आणि सेवानिवृत्त होणारे अधिकारी, जे ई-एचआरएमएसवर नाहीत ते- फॉर्म 6 हा अर्ज भविष्यमध्ये भरतील. निवृत्तीधारकांने ई-साइन (आधार आधारित OTP) सह एकल अर्ज भरुन देणे पुरेसे आहे,असेही त्यांनी पुढे नमूद केले.
नव्याने प्रकाशित केलेल्या युनिफाइड फॉर्मची रचना,निवृत्तीधारकांसाठी ही प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी केली गेली आहे, जेणेकरून अनेक फॉर्म हाताळण्यातील जटिलता कमी होईल आणि लागणारा वेळ आणि मेहनत लक्षणीयरीत्या कमी होईल.या वापरावयास -अनुकूल पध्दतीमुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, तसेच त्यामुळे त्यांना त्यांच्या निवृत्तीवेतन-संबंधित बाबी अधिक सहजतेने आणि सोयीस्करपणे व्यवस्थापित करता येतील.

डॉ. जितेंद्र सिंह यावेळी पुढे म्हणाले, “सरकार ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्याच्या आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाशी वचनबद्ध आहे. हा आधुनिक उपक्रम आमच्या जेष्ठ नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या प्रणाली सुलभ करण्याच्या आणि सुधारण्याच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे.


***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050263)