नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
इरेडा ला एस अँड पी कडून आंतरराष्ट्रीय पत मानांकन, जागतिक स्तरावर अस्तित्व वाढवण्यावर भर
Posted On:
29 AUG 2024 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2024
भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था लिमिटेड (इरेडा) ने आज आंतरराष्ट्रीय पत मानांकन मिळवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय पत मानांकन संस्था एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स लिमिटेड ने इरेडा ला स्थिर आऊटलुकसह 'BBB-' दीर्घ कालावधी आणि 'A-3' अल्प-कालावधी जारीकर्ता पत मानांकन दिले आहे.
हे पत मानांकन इरेडा ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यास, निधीच्या आकर्षक स्त्रोतांचा लाभ उठवण्यास आणि कर्ज घेण्याच्या योजनेला समर्थन देण्यास सक्षम करेल. एस अँड पी ग्लोबल ने आज जारी केलेल्या सुधारित मानांकनात म्हटले आहे, "आम्ही भारतातील वित्त कंपन्यांना मानांकन देण्यासाठी सुरू असलेले सरकारी समर्थन प्रतिबिंबित करण्यासाठी इरेडा ला आमच्या सुरुवातीच्या बिंदूपेक्षा एक पायरी वरचे मानांकन देतो."
इरेडा चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदिप कुमार दास यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला, ते म्हणाले, "इरेडा ला दिलेले आंतरराष्ट्रीय पत मानांकन कार्पोरेट प्रशासनाचे सर्वोच्च मानक कायम ठेवण्याच्या तसेच आमच्या गुंतवणूकदार आणि हितधारकांचा विश्वास कायम राखण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. हे मानांकन स्पर्धात्मक दरांवर निधी प्राप्त करण्याच्या आणि जागतिक बाजारपेठेत आमचे अस्तित्व वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना समर्थन देईल. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आमची मजबूत बाजार स्थिति, मजबूत वित्तीय कामगिरी आणि अनुकरणीय कॉर्पोरेट प्रशासन कायम राखण्यावर आमचा भर आहे."
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049961)
Visitor Counter : 55