पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जनधन योजनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांचे अभिनंदन


कोट्यवधी लोकांना, विशेषत: महिला, युवा आणि उपेक्षित समुदायांना सन्मान मिळवून देण्यात जनधन योजना सर्वाधिक महत्वाची - पंतप्रधान

Posted On: 28 AUG 2024 9:50AM by PIB Mumbai

आज जनधन योजनेचा 10 वा वर्धापन दिन आहे. आर्थिक समावेशनाच्या प्रक्रियेवर या योजनेचा सकारात्मक प्रभाव पडला आहे. त्याचेच महत्व विषद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमीत्त या योजनेचे यश साजरे केले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच ही योजना यशस्वी करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. आर्थिक समावेशनाला चालना देण्यात तसेच कोट्यवधी लोकांना, विशेषत: महिला, युवा आणि उपेक्षित समुदायांना सन्मान मिळवून देण्यात जनधन योजना सर्वाधिक महत्वाची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की, ;
"आज आपण एक अत्यंत महत्त्वाची घटना साजरी करत आहोत —  #10YearsOfJanDhan. सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सर्वांचेही अभिनंदन. आर्थिक समावेशनाला चालना देण्यात आणि कोट्यवधी लोकांना, विशेषत: महिला, तरुण आणि उपेक्षित समुदायांना सन्मान मिळवून देण्यात जनधन योजना सर्वाधिक महत्वाची आहे.
"आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे - #10YearsOfJanDhan. या निमित्ताने मी सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देतो. ही योजना यशस्वी करण्यासाठी अहोरात्र काम केलेल्या सर्वांचेही खूप खूप अभिनंदन. देशाच्या कोट्यवधी नागरिकांना,  विशेषतः आपल्या गरीब बंधु - भगिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून, आणि त्यांना सन्मानानं जगण्याची संधी मिळवून देण्यात जन धन योजना यशस्वी ठरली आहे.

***

SonalT/Tushar Pawar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2049259) Visitor Counter : 99