वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 77 व्या बैठकीत सहा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करण्यात आले मूल्यांकन

Posted On: 22 AUG 2024 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्ट 2024

 

पीएम गतिशक्ती उपक्रमांतर्गत नेटवर्क नियोजन गटाची 77 वी बैठक काल नवी दिल्ली येथे उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रेल्वे मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि बंदरे, नौवहन आणि  जलमार्ग मंत्रालय यांच्याकडील  सहा महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यावर भर देण्यात आला  जेणेकरून पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यामध्ये नमूद  केलेल्या एकात्मिक नियोजनाच्या तत्त्वांना ते अनुरूप असतील. या प्रकल्पांचे मूल्यांकन आणि त्यांचे अपेक्षित परिणाम खाली सविस्तरपणे दिले  आहेत.

महाराष्ट्रात नाशिक येथे मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क

महाराष्ट्रात नाशिक येथे 109.97 एकर परिसरात मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क  विकसित करणे हा ग्रीनफिल्ड प्रकल्प रस्ते आणि रेल्वे वाहतूक यांचे एकत्रीकरण करण्यासाठी, लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी तसेच  कार्गो एकत्रीकरण, साठवणूक  आणि सीमाशुल्क मंजुरी यासारख्या सुविधा प्रदान करून स्थानिक  उद्योगांना मदत करण्याच्या दृष्टीने  तयार करण्यात आहे. 2029 पासून या प्रकल्पाद्वारे  वार्षिक 3.11 दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळणी  अपेक्षित आहे.

गुजरातमधील हजीरा - गोथंगम नवीन रेल्वे मार्ग

गुजरातमधील ग्रीनफील्ड प्रकल्पामध्ये  गोथंगमला हझिराशी  जोडणाऱ्या 36.35  किमी ब्रॉडगेज दुहेरी मार्गाच्या बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा उद्देश सेक्शन क्षमता वाढवणे आणि प्रमुख उद्योग आणि हाजीरा बंदर या  प्रमुख कार्गो हब शी कनेक्टिव्हिटी सुधारणे हा आहे. मोठ्या प्रमाणात आणि कंटेनरयुक्त कार्गोच्या प्रभावी वाहतुकीला मदत करून , या प्रकल्पाद्वारे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणे, रस्त्यावरील वाहतूक कोंडी  कमी करणे आणि  रस्तेमार्गेऐवजी  रेल्वेमार्गे  वाहतूक करून पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होण्याची शक्यता आहे.

आसाममधील बिलासीपारा - गुवाहाटी मार्ग

आसाममधील चिरकुट (बिलासीपारा) आणि तुलुंगिया दरम्यान 44.56 किमी लांबीच्या एनएच -17 या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण

बिहता विमानतळ, पटणा बिहार येथे नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करणे  

बिहारमधील ब्राउनफील्ड प्रकल्पात पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळापासून  28 किमी अंतरावर बिहता एअरफील्ड येथे नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करणे समाविष्ट आहे.

बागडोगरा विमानतळ, सिलीगुडी, पश्चिम बंगाल येथे नवीन  सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करणे

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील बागडोगरा विमानतळावर नवीन सिव्हिल एन्क्लेव्हच्या विकासाचा समावेश असलेला ब्राउनफील्ड प्रकल्प.

अंदमान आणि निकोबारमधील  गलाथिया बे इथे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदराचा विकास

अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील ग्रेट निकोबार बेटावरील गॅलेथिया बे येथे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर  (ICTP) विकसित करण्यासाठी एक परिवर्तनात्मक  प्रकल्प. या प्रकल्पासाठी 44,313 कोटी रुपये खर्च येणार असून या ग्रीनफिल्ड उपक्रमाचे उद्दिष्ट खाडीच्या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या स्थानाचा आणि खोल पाण्याचा लाभ घेणे हा आहे. हे बंदर भारतातली बंदरे आणि शेजारच्या देशांमधील बंदरांमधील ट्रान्सशिपमेंट कार्गो हाताळणे अपेक्षित आहे.

मल्टीमोडल पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास, आर्थिक आणि सामाजिक नोड्सशी लास्ट -माईल कनेक्टिव्हिटी, इंटरमॉडल कनेक्टिव्हिटी आणि प्रकल्पांची योग्य वेळेत आणि योग्य गतीने अंमलबजावणी या  पीएम  गतिशक्तीच्या तत्त्वांच्या दृष्टीकोनातून नेटवर्क नियोजन गटाने सर्व सहा प्रकल्पांचे मूल्यमापन केले.

हे प्रकल्प  राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील तसेच वाहतुकीच्या विविध साधनांचे  एकत्रिकरण आणि भरीव सामाजिक-आर्थिक लाभ आणि जीवन  सुलभता प्रदान करून  प्रदेशांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावतील अशी अपेक्षा आहे.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2047831)