संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्राझीलचे नौदल कमांडर एडमिरल मार्कोस सांपायो ऑल्सेन यांचा भारत दौरा

Posted On: 21 AUG 2024 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024

ब्राझीलचे नौदल कमांडर एडमिरल मार्कोस सांपायो ऑल्सेन दिनांक 19 ते 24 ऑगस्ट 2024 या काळात अधिकृत भारत भेटीसाठी आले आहेत. दोन्ही देशांमधील सागरी सहकार्यात वाढ करणे तसेच सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील सामायिक आव्हानांच्या बाबतीत सहयोगी संबंध तसेच सहकार्य यांच्याप्रती समविचारी नौदलांच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवणे हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे.

एडमिरल मार्कोस सांपायो ऑल्सेन यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के.त्रिपाठी यांची भेट घेतली आणि परिचालन  संदर्भातील सहभाग, तंत्रज्ञानविषयक सहकार्य तसेच प्रशिक्षण यांच्या संदर्भातील विविध पैलूंवर चर्चा केली. अॅडमिरल ओल्सन यांना साऊथ ब्लॉक लॉन्स येथे समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.

विविध परिचालनात्मक संवाद,प्रशिक्षणविषयक सहकार्य तसेच इतर सागरी घटकांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय नौदल ब्राझीलच्या नौदलाशी सहकार्य करत असते. ही दोन्ही नौदले मिलन आणि भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका सागरी मंच (आयबीएसएएमएआर) यांसारख्या बहुपक्षीय मंचाच्या माध्यमातून देखील एकमेकांशी संवाद साधत आहेत.दोन्ही देशांतील संरक्षण मंत्रालयांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त संरक्षण समितीच्या माध्यमातून दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्यविषयक उपक्रम राबवण्यात येतात. ब्राझीलचे नौदल कमांडर, त्यांच्या अधिकृत कार्यक्रमांचा भाग म्हणून नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव, राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक तसेच लष्कर उपप्रमुखांची देखील भेट घेणार आहेत. या भारत भेटी दरम्यान एडमिरल मार्कोस सांपायो ऑल्सेन  गुरगाव येथील माहिती एकत्रीकरण केंद्र-हिंदी महासागरी प्रदेश (आयएफसी-आयओआर) येथे देखील जाणार असून संरक्षण क्षेत्रातील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील.

नवी दिल्ली सोबतच, ब्राझीलचे नौदल कमांडर मुंबईला देखील भेट देणार असून तेथे ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांची भेट घेऊन चर्चा करतील तसेच ते भारतीय बनावटीच्या युद्धनौका; नौदल डॉकयार्ड; आणि माझगाव डॉक जहाजबांधणी येथे देखील भेट देतील.

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2047291) Visitor Counter : 51