ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरोने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली हॅकेथॉन


भारतीय मानकांना प्रोत्साहन देणाऱ्या ऑनलाईन उपक्रमांसाठी व्यासपीठ विकसित करण्याचे हॅकेथॉन चे उद्दिष्ट

Posted On: 20 AUG 2024 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024

 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस),अर्थात भारतीय मानक ब्युरोने हॅकेथॉन स्पर्धेची घोषणा केली असून,त्यामध्ये सहभागी होण्यासाठी बीआयएस बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेल्या संस्थांमधील विद्यार्थी संघांना आमंत्रित केले आहे. बीआयएस द्वारे ओळखल्या गेलेल्या वास्तविक-जगातील आव्हाने हाताळून, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि सहयोगी कौशल्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.हॅकेथॉन विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपक्रम आणि गेम आयोजित करणारे व्यासपीठ विकसित करण्यामध्ये योगदान देण्याची अनोखी संधी प्रदान करेल.

भारतीय मानकांबद्दल  स्वारस्य निर्माण करणे, ज्ञान वाढवणे, तसेच सर्वसामान्य जनता आणि बीआयएस भागधारकांसाठी गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात असलेल्या त्याच्या महत्वाच्या भूमिकेबद्दल जागरुकता वाढवणे, हे याचे उद्दिष्ट आहे. देशाच्या पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाकरता गुणवत्ता आणि मानकांबद्दल जागरुकता असणे अत्यंत आवश्यक आहे.

हॅकेथॉनचे मुख्य तपशील:


S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2047052) Visitor Counter : 60