संरक्षण मंत्रालय
विकसित भारत@2047 साठी मार्गदर्शक आराखड्याबाबत भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून विचारमंथन
Posted On:
19 AUG 2024 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते . 30 जून 2024 रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनरल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे. उद्या 20 ऑगस्टला ही बैठक पुढे सुरू राहणार असून या बैठकीला भारतीय सैन्याच्या सात कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (GOC-in) उपस्थित राहणार आहेत.
आजच्या चर्चेचा भर 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश, जागतिक स्तरावरील एक प्रमुख देश आणि राहण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेला देश बनवण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाला अनुरूप अशी अमृत काळातील भारतीय लष्कराच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवणे यावर होता. या बैठकीच्या निमित्ताने भारतीय लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धोरणात्मक मुद्द्यांवर विचारमंथन करण्याची आणि पुढील दोन दशकांसाठी भारतीय लष्कराच्या परिवर्तनाची दिशा ठरवण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय लष्कराकडून सध्या सुरु असलेले परिवर्तनात्मक उपक्रम आणि विकसित भारत @2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यात त्याचे योगदान यावर या चर्चेचा प्रामुख्याने भर होता.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2046762)
Visitor Counter : 62