केंद्रीय लोकसेवा आयोग

यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोक सेवा आयोगाने घेतलेल्या 'कम्बाइंड सेक्शन ऑफिसर्स' (ग्रेड'बी') मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

Posted On: 19 AUG 2024 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्ट 2024

यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोक सेवा आयोगाने  डिसेंबर, 2023 मध्ये घेतलेल्या ‘संयुक्त विभागीय अधिकारी ('बी' दर्जा) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, गुणवत्ता क्रमवारीनुसार खाली नमूद केली आहे:-

श्रेणी

सेवा

II

भारतीय परराष्ट्र सेवेच्या सामान्य संवर्गातील  विभाग अधिकारी श्रेणी, शाखा बी

 

रिक्त पदे आणि शिफारस केलेल्या उमेदवारांची  माहिती पुढील चौकटीत दिली आहे:-

श्रेणी

सेवा

भारतीय परराष्ट्र सेवेच्या सामान्य संवर्गातील विभाग अधिकारी श्रेणी, शाखा 'बी’

आरक्षण

रिक्तपदे

शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या

II

General

27

26

 

SC

02

02

 

ST

01

01

 

Total

30

{including 01 PwBD-3}

29

 


उमेदवारांची अंतिम निवड निश्चित केली जाईल आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने  जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे इतर गोष्टींसोबत निकाल घोषित केला जाईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिसरामध्ये परीक्षा कक्षा  इमारतीजवळ एक 'सुविधा केंद्र' आहे.या केंद्रावरून  उमेदवार त्यांच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00च्या दरम्यान या काउंटरवरून वैयक्तिकरित्या मिळवू शकतात. किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271 आणि 011-23381125 यावर माहिती मिळू शकेल.  निकाल यूपीएसासी (www.upsc.gov.in. ) संकेतस्‍थळावर देखील उपलब्ध असेल.  निकाल जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत गुण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2046673) Visitor Counter : 31