उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती “आपल्या अर्थव्यवस्थेचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे आवाहन करते ” ही अत्यंत चिंताजनक बाब आहे -उपराष्ट्रपती


उपराष्ट्रपतींनी युवकांना करिअरच्या पारंपरिक मार्गांची चौकट ओलांडण्याचे आणि करिअरचे अधिक लाभदायक आणि प्रभावी पर्याय शोधण्यासाठी केले प्रोत्साहित

समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशामुळे भारत ही बौद्धिक संपदेची सोन्याची खाण आहे - उपराष्ट्रपती

Posted On: 16 AUG 2024 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024

घटनात्मक पदावर असलेली  व्यक्ती आपल्या  अर्थव्यवस्थेचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या कथानकाला बळ देण्यासाठी अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे  सर्वोच्च न्यायालयाकडे आवाहन करते याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चिंता व्यक्त केली.

दिल्लीतील राष्ट्रीय विधि विद्यापीठात (एनएलयू) आयपी लॉ आणि मॅनेजमेंटमधील जॉइंट मास्टर्स/एलएलएम पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीला  संबोधित करताना धनखड  म्हणाले, ...संस्थेचे अधिकार क्षेत्र भारतीय राज्य घटनेने परिभाषित केले आहे, मग ते कायदेमंडळ असो किंवा  कार्यपालिका  असो, किंवा  न्यायपालिका असो. न्यायालयांचे अधिकार क्षेत्र ठरवलेले आहे. जगभरात  पहा, अमेरिकेतील  सर्वोच्च न्यायालय, ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालय किंवा इतर प्रारूप  पहा.

त्यांनी एकदा तरी स्वतःहून हस्तक्षेप केला आहे काराज्यघटनेत दिलेल्या तरतूदीच्या पलीकडे उपाय  निर्माण झाला आहे का?   राज्यघटनेने मूळ अधिकार क्षेत्र, अपील अधिकार क्षेत्र प्रदान केले आहे. तसेच पुनरावलोकनाची तरतूद  देखील आहे.

मात्र आपल्याकडे क्युरेटीव्ह  याचिका आहे! घटनात्मक पदावर असलेल्या एका व्यक्तीने, गेल्याच आठवड्यात माध्यमांत जाहीर केले ,, आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हेतू असलेल्या एका खोट्या नरेटीव्हला  बळ  देण्यासाठी स्वतःहून दखल   घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, ही बाब चिंताजनक आहे असे ते  पुढे म्हणाले.

राष्ट्रहितापेक्षा पक्षपाती किंवा स्वार्थाला प्राधान्य देणाऱ्या शक्तींना प्रभावहीन  करण्याचे आवाहन त्यांनी  युवकांना केले आणि अशा कृतींमुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते यावर भर दिला.

एनएलयू दिल्ली येथे उपस्थितांना संबोधित करतानाधनखड यांनी कोचिंग सेंटर्सची मोठी संख्या आणि वृत्तपत्रांमधील त्यांच्या जाहिरातींचा उल्लेख केला ज्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी तेच यशस्वी चेहरे पुन्हा पुन्हा दाखवले जातात.

धनखड यांनी युवकांना करिअरच्या पारंपरिक मार्गांची चौकट ओलांडण्याचे आणि करिअरचे अधिक लाभदायक आणि प्रभावी पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहित केले.

भारत ही बौद्धिक संपदेची सोन्याची खाण आहे  आणि वेद, प्राचीन धर्मग्रंथ हे भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा पाया आहे असे ते म्हणाले. भारताच्या बौद्धिक खजिन्याची ही प्रमुख उदाहरणे आहेत असे उपराष्ट्रपती म्हणाले. त्यांनी प्रत्येकाला वेद त्यांच्या भौतिक स्वरूपात आत्मसात करण्याचे आवाहन केले तसेच  जीवन समृद्ध करण्याच्या आणि प्रत्येक समस्येवर उपाय पुरवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर भर  दिला .

जागतिकीकरणाच्या युगात बौद्धिक संपदा (आयपी) हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा  बनला आहे असे धनखड म्हणाले आणि  भारतासारख्या देशासाठी , त्याच्या अफाट लोकसंख्येसाठी, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सक्षम करण्यासाठी मजबूत आयपी  संरक्षण आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले .

संपूर्ण भाषण इथे वाचा : https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2045853

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2045996) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu