आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी 75 ‘आशा’ आणि ‘एएनएम’ कार्यकर्त्यांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून निमंत्रित


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी 75 आशा आणि ‘एएनएम’ सेवाव्रतींच्या योगदानाचा केला गौरव

Posted On: 14 AUG 2024 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज विज्ञान भवन येथे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विविध आरोग्य उपक्रमांच्या यशस्वितेसाठी केलेल्या समर्पणाचा आणि अथक प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी 75 ‘आशा’ (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य सेविका) आणि एएनएम(सहायक परिचारिका मिडवाइव्ह) यांचा सत्कार केला. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव   करण्यासाठी, 75 आशा आणि एएनएम यांना त्यांच्या जोडीदारांसह, 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.हे सेवाव्रती उद्या लाल किल्ल्यावरून 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होतील.

आशा  आणि एएनएम कार्यकर्ते म्हणजे   "देशाचे आरोग्य परिदृश्य सुधारण्यासाठी झटणारे सेवाव्रती आहेत. त्यांच्या अपवादात्मक आणि अथक प्रयत्नांसाठी प्रशंसा करताना,  अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, “सध्या आपल्या देशात 10.29 लाखाहून अधिक आशा आणि 89,000 एएनएम आहेत.  ही मंडळी  सामुदायिक  आरोग्याचा आधारस्तंभ म्हणून काम करतात आणि तळागाळातील आरोग्य सेवेमध्ये परिवर्तन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांच्या योगदानामध्ये समुदायांना एकत्रित करणे, आरोग्य सेवा सुलभ करणे, समुदाय-स्तरीय आरोग्य सेवा प्रदान करणे आणि आरोग्य जागरूकता वाढवणे यांचा समावेश आहे. अत्यंत दुर्गम आणि असुरक्षित भागातील  लोकांपर्यंत अत्यावश्यक आरोग्य सेवा वितरित करण्यासाठी त्यांचे समर्पण आवश्यक आहे. पोहोचण्यासाठी दुर्गम् अशा  भागात त्यांच्या कार्याचा प्रभाव खोलवर आहे आणि आपण  सर्वांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे मनापासून कौतुक करीत आहे.”

यावेळी बोलताना पटेल यांनी आशा आणि एएनएमने राष्ट्रासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण सेवेबद्दल त्यांचे आभार मानले आणि पुढे सांगितले की, “आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी म्हणजे 2047 पूर्वी भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न केवळ आमच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने साध्य होऊ शकते. एक निरोगी राष्ट्र हेच खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र असू शकते.”

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2045472) Visitor Counter : 62