पंचायती राज मंत्रालय
पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीच्या डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये पंचायती राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
14 AUG 2024 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीच्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये पंचायती राज संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले. विकसित भारत संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तळागाळातील महिला नेत्यांना सशक्त बनवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ही कार्यशाळा ओळखली जात आहे. ही कार्यशाळा 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेसाठी पंचायती राज संस्थांमध्ये (पीआरआय) निवडून आलेल्या अंदाजे 400 महिला प्रतिनिधी (ईडब्ल्यूआर) आणि निवडलेल्या प्रतिनिधींना (ईआर) विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी, आणि नवज्योती इंडिया फाऊंडेशन आणि इंडिया व्हिजन फाऊंडेशनचे संस्थापक विवेक भारद्वाज, पंचायती राज मंत्रालयाचे सचिव डॉ.चंद्रशेखर कुमार, पंचायती मंत्रालयाच्या विशेष सचिव ममता वर्मा, यांच्या हस्ते झाले.यावेळी पंचायती राज मंत्रालयाचे सहसचिव विकास आनंद, सहसचिव,यांच्यासह सुमारे 400 विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पंचायती राज संस्थांच्या (पीआरआय) निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी (ईडब्ल्यूआरएस) त्यांच्या जोडीदारांसह, दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते तसेच भारत सरकार आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी पंचायत प्रतिनिधींना "सरपंच पती" किंवा "प्रधान पती" सारख्या प्रथा बंद करण्यासाठी वैयक्तिक पुढाकार घेण्याचे आवाहन केले आणि त्यांना स्वतःच्या शहाणपणाने, निष्पक्षतेने आणि सामूहिक प्रगतीसाठी वचनबद्धतेने निर्णय घेण्याचे आवाहन केले. सचिव विवेक भारद्वाज यांनी स्पष्टपणे सांगितले की, एक मजबूत, सर्वांच्या दृष्टीने अधिकाधिक समावेशक भारत निर्माण करण्यासाठी महिलांच्या परिवर्तनशील शक्तीची आवश्यक आहे.

पंचायतींमधील महिला नेतृत्वावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे थेट वेबकास्टिंग मंत्रालयाच्या YouTube चॅनेल आणि समाज माध्यमावरील पृष्ठांवर उपलब्ध आहे : एनआयसी वेबकास्ट:
https://webcast.gov.in/mopr;X(Twitter):https://x.com/MoPR_GoI;Facebook:https://www.facebook.com/MinistryOfPanchayatiRaj;Instagram:https://www.instagram.com MinistryOfPanchayatiRaj; YouTube: https://www.youtube.com/@MinistryOfPanchayatiRaj
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045458)