संरक्षण मंत्रालय

विंग कमांडर अक्षय अरुण महाले (29451) वायुसेना (वैमानिक) यांना राष्ट्रपतींतर्फे वायू सेना शौर्य पदक जाहीर

Posted On: 14 AUG 2024 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

  1. विंग कमांडर अक्षय अरुण महाले (29451) वायुसेना (वैमानिक) यांची नेमणूक लढाऊ विमानांच्या तुकडीत झालेली आहे.
  2. 26 सप्टेंबर 2023 रोजी त्यांना रहिवासी क्षेत्राजवळ उंचीवरील प्रदेशातील तलावावर पुढच्या कॉकपिट मध्ये बसून कमी उंचीवरील हवाई उड्डाण करण्यास सांगितले होते. त्यावेळी 270 एम एजीएलच्या उंचीवर असताना कमी वेगात विमानाला नियंत्रित करत असताना, थ्रोटल मॅक्स ड्राय उर्जा मोडवर असताना, वैमानिकाला विमानाचा जोर कमी होऊन आरपीएम 83% वर स्थिर होत असल्याचे तसेच टर्बाईनमधील हवेचे तापमान (टीजीटी) 80 ते 90 अंश सेल्सियसने वाढल्याचे निदर्शनास आले. मंजूर मर्यादेपेक्षा हे तापमान कितीतरी अधिक होते. या गंभीर उड्डाणावस्थेत विमानाचे केवळ एकच इंजिन उपलब्ध असताना, विमानाचा वेग भराभर 250 किमी प्रती तास पेक्षा कमी होऊ लागला. अशा स्थितीत, विमान जलदगतीने खाली येऊ लागले आणि विमानाचा वेग देखील आणखी कमी होऊ लागला. त्यामुळे वैमानिकाला विमानावर नियंत्रण ठेवायला वेळ मिळाला नाही. अशा भीषण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवून, वैमानिकाने त्याचे विमान भर वस्तीच्या भागापासून दूर वळवले. त्यावेळी नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरोधात जात त्याने विमानाचा वेग वाढवण्यासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या कमी उंचीचा वापर करुन कार्यकारी इंजिनला पुन्हा गरम करून विमानाला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. जर वैमानिकाने ही पावले उचलली नसती तर उड्डाणाच्या वेळेची गंभीर स्थिती लक्षात घेता या विमानाला भयंकर आपत्तीजनक अनियंत्रित परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. त्यानंतर विमानाने हळूहळू इच्छित उंची गाठली आणि ते सुरक्षितपणे पूर्ववत कार्यरत झाले. उपलब्ध असलेल्या अत्यंत कमी वेळात, वैमानिकाने जर आवश्यक कृती करण्यात दिरंगाई केली असती अथवा यापेक्षा वेगळ्या अशा इतर क्रमाने कृती केली असती तर या घटनेत जीवितहानी तसेच राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान होऊ शकले असते.
  3. या जीवघेण्या परिस्थितीत वैमानिकाने संयम राखला आणि अत्युच्च धैर्य, नेतृत्वगुण, समयसूचकता तसेच समग्र व्यावसयिकतेचे दर्शन घडवत विमानाला सुरक्षितपणे संकटातून बाहेर काढले. हाताशी अत्यंत कमी वेळ आणि कमी उंची उपलब्ध असताना, कल्पनातीत गंभीर आपत्तीच्या परिस्थितीत, वैमानिकाने केलेल्या अशा उत्कृष्ट कृतींमुळे मौल्यवान राष्ट्रीय मालमत्तेची हानी टळली तसेच त्या भागातील नागरिकांचे जीव आणि मालमत्ता देखील बचावल्या.
  4. अतुलनीय धैर्य दाखवत केलेल्या या कार्यासाठी विंग कमांडर अक्षय अरुण महाले यांना ‘वायू सेना पदक (शौर्य)’ जाहीर झाले आहे.

 


S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2045289) Visitor Counter : 45