संरक्षण मंत्रालय
लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या तयारीचा संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Posted On:
13 AUG 2024 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2024
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 13 ऑगस्ट, 2024 रोजी, लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, संबंधित अधिकारी आणि कर्तव्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
देशासाठी बलिदान देणारे योद्धे नेहमीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असतील, असे सेठ यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना सांगितले. संरक्षण राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्सचे ‘भविष्यातील सैनिक’ असे वर्णन केले तसेच ते देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी मजबूत आधारस्तंभ असतील, असे सांगितले. “तुम्ही सामाजिक सेवा आणि समुदाय विकासाचे अनेक उपक्रम घेऊन परिवर्तनाचे जोमदार गुणक म्हणून काम करत आहात. तुम्ही स्वच्छ गंगा - स्वच्छ भारत राष्ट्रीय मोहीम, आंतरराष्ट्रीय योग दिवस यांसारख्या अनेक राष्ट्रीय मोहिमांमध्ये काम केले आहे तसेच पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने या मोहिमांना यश मिळवून दिले आहे. आताही तुम्ही स्वातंत्र्यदिन सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहात”, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “आत्मनिर्भर भारत” आणि “विकसित भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सची भूमिका महत्त्वाची ठरेल, हे मंत्र्यांनी अधोरेखित केले.
संजय सेठ यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या उत्साहाचे आणि मनोबलाचे कौतुक केले आणि त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविले.

* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2044966)
Visitor Counter : 61