ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरोकडून आयुष क्षेत्रात प्रमाणीकरणासाठी समर्पित मानकीकरण विभागाची स्थापना

Posted On: 09 AUG 2024 11:54AM by PIB Mumbai

 

भारतीय मानक संस्था असलेल्या भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) ने आयुष क्षेत्रासाठी मानकीकरण सुरू केले आहे. एका समर्पित मानकीकरण विभागाच्या स्थापनेसह, ब्युरोने या क्षेत्रात मानकीकरणाच्या प्रक्रियांना गती दिली आहे. हा नवीन विभाग आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, उनानी, सिद्ध, सोवा, रिगपा आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपारिक भारतीय औषध प्रणालींचा समावेश असलेल्या आयुषमधील उत्पादने आणि पद्धतींची सुरक्षा, कार्यक्षमता आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

 

आयुषसाठी मानकीकरणाच्या कृतींची  प्रक्रिया आणि रचना स्पष्ट करताना, बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले, “प्रसिद्ध तज्ञांच्या नेतृत्वाखाली, बीआयएस मधील आयुष विभागाने सात विभागीय समित्या स्थापन केल्या आहेत, यातील प्रत्येक समिती विशिष्ट आयुष प्रणालीशी संबंधित आहे. या समित्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांसह सर्वसमावेशक, दाखला-आधारित मानके सुनिश्चित करण्यासाठी तज्ञ, वैज्ञानिक आणि तांत्रिक संस्था, उद्योग प्रतिनिधी आणि नियामक संस्था यांच्यासारख्या विविध हितधारकांसोबत सहकार्याने काम करतात. बीआयएसने आजतागायत एकेरी औषधी वनस्पती, आयुर्वेद आणि योग शब्दावली, पंचकर्म उपकरणे, योग उपकरणे आणि औषधी वनस्पतींमधील कीटकनाशकांच्या अवशेषांची चाचणी पद्धत यांसारख्या विविध विषयांचा समावेश असलेली 91 मानके प्रकाशित केली आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींसाठी 80 देशी भारतीय मानकांचे प्रकाशन त्यांच्या सुरक्षित आणि प्रभावी वापराला प्रोत्साहन देते, ज्यामुळे ग्राहक आणि उद्योग दोघांनाही लाभ मिळत आहेत. याव्यतिरिक्त, पंचकर्म उपकरणांसाठी प्रथमच राष्ट्रीय मानके रोगप्रतिबंधक आणि उपचारात्मक प्रक्रियांमध्ये एकसमानता सुनिश्चित करत आहेत, ज्यामुळे आयुष आरोग्य सेवा पद्धतींच्या गुणवत्तेत सुधारणा होते. पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, बीआयएस ने देशांतर्गत उत्पादक आणि शेतकऱ्यांना पाठबळ देत "कॉटन योगा मॅट" साठी स्वदेशी भारतीय मानक तयार केले आहे. विभागाने भविष्यातील मानकीकरण क्षेत्रे देखील निश्चित केली आहेत, ज्यात शब्दावली, एकेरी औषधी वनस्पती, योग पोशाख, सिद्ध निदान आणि होमिओपॅथिक मिश्रणे यांचा समावेश आहे. बीआयएस उपक्रमांचे कौतुक करताना, आयुषचे सचिव, वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, “जसजसे जास्तीतजास्त लोक पारंपरिक आरोग्य सेवा प्रणालीकडे वळू लागले आहेत, तसतशी आयुष उत्पादने आणि सेवांमध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता आवश्यक झाली आहे. बीआयएसने हा समर्पित विभाग स्थापन करून आणि IS: 17873 'कॉटन योगा मॅट' सारखी महत्त्वाची मानके विकसित करून या क्षेत्रातील आपली वचनबद्धता प्रदर्शित केली आहे. पारंपरिक भारतीय औषधांचा प्रचार आणि विकास करण्यासाठी हे महत्त्वाचे टप्पे आहेत. कठोर मानके आणि नवोन्मेषाद्वारे, बीआयएस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुष प्रणालीची स्वीकृती आणि वृद्धी करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

***

JPS/S.Patil/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2043818) Visitor Counter : 47