ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 31 जुलै 2024 पर्यंत देशाची 2.60 लाख टन कांदा निर्यात


किंमत स्थिरीकरण साठ्यासाठी केंद्र सरकार द्वारे 4.68 लाख टन कांदा खरेदी

Posted On: 07 AUG 2024 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024

सरकारने 4 मे 2024 पासून कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेतली असून, 550 डॉलर्स (USD) प्रति मेट्रिक टन किमान निर्यात दर (MEP) आणि 40% निर्यात शुल्कासह निर्यातीला परवानगी दिली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 31 जुलै 2024 पर्यंत देशाची एकूण कांदा निर्यात 2.60 लाख टन इतकी झाली. त्याशिवाय, कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठीचा साठा (बफर) म्हणून, सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (NCCF) आणि नाफेड (NAFED), अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघा मार्फत महाराष्ट्रातून 4.68 लाख टन कांदा खरेदी केली होती.

मागील वर्षाच्या (2023) तुलनेत चालू वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळाला. एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील बाजारपेठेत कांद्याचे सरासरी मासिक दर रु. 1,230 ते रु. 2,578 प्रति क्विंटल इतके होते. मागील वर्षी (2023), याच कालावधीत ते रु. 693 ते रु. 1,205 प्रति क्विंटल इतके होते. चालू वर्षात बफरसाठी कांदा खरेदीचा सरासरी दर रु.2,833 प्रति क्विंटल होता. मागील वर्षाच्या रु.1,724 प्रति क्विंटलच्या खरेदी दरापेक्षा तो 64% जास्त आहे.

भारत हा प्रमुख कांदा निर्यातदार देश असून, तो निर्यातीमधून उत्पन्न मिळवतो. गेल्या तीन वर्षांत भारताने कांदा निर्यातीमधून मिळवलेले एकूण उत्पन्न 2021-22 मध्ये रु.3,326.99 कोटी, 2022-23 मध्ये रु.4,525.91 कोटी आणि 2023-24 मध्ये रु.3,513.22 कोटी इतके होते.

मागील तीन वर्षांतील कांदा उत्पादनाची राज्यनिहाय आकडेवारी, आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (MoSPI) मंत्रालयाच्या कांद्याचा घरगुती वापर सर्वेक्षण, 2022-23 च्या अहवालामध्ये मोजणी केलेला कांद्याचा वार्षिक घरगुती वापर परिशिष्ट-I मध्ये दिला आहे.

मागील तीन वर्षातील कांद्याची देशनिहाय निर्यात आणि आयात याचा तपशील परिशिष्ट-II मध्ये दिला आहे.

परिशिष्ट-I

गेल्या तीन वर्षांतील (2021-22 ते 2023-24) कांद्याचे प्रत्येक वर्षातील राज्यवार उत्पादन आणि वार्षिक घरगुती वापर 2022-23 लाख मेट्रिक टन मध्ये.

States

2023-24

2022-23

2021-22

Annual Household Consumption 2022-23*

Andhra Pradesh

5.13

9.56

7.23

7.64

Bihar

13.88

13.44

13.75

20.88

Chhattisgarh

3.80

3.93

3.88

3.89

Gujarat

20.57

20.47

25.55

10.55

Haryana

5.41

5.38

5.14

5.82

Karnataka

16.38

26.65

27.80

9.79

Madhya Pradesh

41.66

52.62

47.41

10.87

Maharashtra

86.02

120.33

136.69

17.13

Odisha

3.69

3.69

3.69

6.37

Punjab

2.67

2.49

2.45

5.60

Rajasthan

16.31

16.15

14.48

9.29

Tamil Nadu

4.38

5.25

6.08

14.32

Telangana

1.00

1.29

1.77

3.37

Uttar Pradesh

5.77

5.11

5.09

27.64

West Bengal

8.85

8.92

8.96

14.23

NCT Delhi

0

0

0

2.52

Others

6.62

6.79

6.92

23.71

All India

242.12

302.08

316.87

193.61

स्रोत: कांदा उत्पादन कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून.

कांद्याच्या वार्षिक घरगुती वापराची आकडेवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या 2022-23 च्या घरगुती उपभोग सर्वेक्षणाच्या अहवालामधून.

परिशिष्ट-II

 

भारताची देशवार कांदा आयात मेट्रिक टन मध्ये

       

Country

2021-22

2022-23

2023-24

BANGLADESH PR

6.59

6.71

7.24

SRI LANKA DSR

1.63

2.71

1.7

MALAYSIA

1.7

3.93

1.67

U ARAB EMTS

1.23

4.03

1.55

NEPAL

1.68

1.76

0.81

INDONESIA

0.38

1.17

0.47

VIETNAM SOC REP

0.18

0.76

0.47

QATAR

0.33

0.8

0.34

OMAN

0.15

0.62

0.28

KUWAIT

0.24

0.45

0.28

OTHERS

1.27

2.13

1.27

TOTAL

15.39

25.27

16.07

       

Country-wise import of Onion by India in Metric Tons

       

Country

2021-22

2022-23

2023-24

AFGHANISTAN

23,727.16

0

20,088.45

EGYPT A RP

1,475.10

0

0

IRAN

812

0

428.06

KOREA RP

0.09

0

0

TURKEY

372.69

0

0

U ARAB EMTS

2,125.56

0

0

TOTAL

28,512.60

0

20,516.52

स्रोत: वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा व्यापार सांख्यिकी विभाग

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री बीएल वर्मा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 




(Release ID: 2042891) Visitor Counter : 129