कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (NCGG) यांच्या वतीने FIPIC आणि IORA देशांतील नागरी सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी प्रगत नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजित

Posted On: 07 AUG 2024 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024

सुशासनासाठी राष्ट्रीय केंद्र (नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स,NCGG), यांच्या वतीने आज, मसूरी येथे हिंद-प्रशांत महासागर राष्ट्रांचा सहकार्य मंच, FIPIC आणि IORA या  विभागातील विविध देशातील नागरी सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासन यावरील पहिला प्रगत नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजित केला  आहे.सेशेल्स, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, श्रीलंका, टांझानिया, मादागास्कर, फिजी, केनिया, मालदीव आणि मोझांबिक येथील 40 प्रतिष्ठित नागरी सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम 5 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित केला आहे. यात ‌सहभागी झालेले कर्मचारी आपापल्या देशांत महासंचालक, सचिव, जिल्हा प्रशासक, महाव्यवस्थापक, वरिष्ठ मानव संसाधन अधिकारी आणि उद्योग समन्वयक तसेच त्यांच्या संबंधित देशांतील महत्त्वपूर्ण मंत्रालये आणि संस्थांवरील  महत्त्वाच्या क्षेत्रातील पदे धारण करत आहेत.

नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स, ही केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाअंतर्गत येणारी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग,यासाठी असलेली स्वायत्त संस्था असून,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर कृती संशोधन, अभ्यास आणि क्षमता निर्माण करण्यासाठी ही संस्था  प्रतिबद्ध आहे.एनसीजीजीची तत्वे  'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजेच "जग एक कुटुंब आहे"  या भारतीय तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहेत आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर आणि इतर देशांसोबत सहकार्य वाढवण्यावर यांचा भर आहे.

एनसीजीजीचे महासंचालक, आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी (DARPG) विभागाचे सचिव, श्री व्ही. श्रीनिवास, यांनी त्यांच्या उद्‌घाटनपर भाषणात, FIPIC आणि IORA) अंतर्गत विविध देशांतील सहभागींचे स्वागत केले.त्यांनी सेवा वेळेत पुरवण्यावर भर देत,नागरिकांना सरकारच्या जवळ आणण्यात तंत्रज्ञानाच्या असलेल्या महत्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित केले. तसेच त्यांनी सहभागी प्रतिनिधींना गटचर्चेत भाग घेण्यास,आपले विचार सामायिक करण्यास‌ आणि डिजिटल माध्यमाद्वारे, नागरी सेवा इतिहास शाश्वत विकास उद्दिष्टे आणि आपापल्या देशाचा संदर्भ देत पायाभूत सुविधांचा विकास करणे अशा विविध विषयांवर प्रशासन सादरीकरण करण्याचे आवाहन केले.  

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2042678) Visitor Counter : 70