गृह मंत्रालय
कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याच्या परिवर्तनकारक निर्णयामुळे उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात झाली असून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही बळकट झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
प्रदेशातील तरुणांनी घडवलेल्या सामाजिक-आर्थिक विकास आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाद्वारे शांतता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना घवघवीत यशप्राप्ती
Posted On:
05 AUG 2024 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2024
कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याच्या परिवर्तनकारक निर्णयामुळे उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात झाली असून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही बळकट झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या परिवर्तनकारक निर्णयामुळे उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात झाली असून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तळाच्या स्तरापर्यंत लोकशाही मजबूत झाली आहे. प्रदेशातील तरुणांनी सामाजिक-आर्थिक वाढ आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणले आहे, ज्यामुळे शांतता आणि सर्वसमावेशक विकासासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आम्ही मोदीजींचे आभार मानतो आणि प्रदेशाच्या आकांक्षा आणि परिवर्तनकारक प्रगतीसाठी आमच्या समर्पणाचा पुनरुच्चार करतो.”
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041829)
Visitor Counter : 84