सांस्कृतिक मंत्रालय
युग युगीन भारत संग्रहालयासाठीच्या तीन दिवसीय परिषदेत 80 संस्था तसेच 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील संग्रहालय व्यावसायिकांनी घेतला भाग
या परिषदेत भारतातील आणि परदेशातील नामवंत संग्रहालय तज्ञांच्या नेतृत्वाखाली क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
04 AUG 2024 1:26PM by PIB Mumbai
सांस्कृतिक मंत्रालयाने आगामी युग युगीन भारत संग्रहालयासाठी तीन दिवसीय राज्य संग्रहालय परिषद, भागधारक सल्लामसलत आणि क्षमताबांधणी कार्यशाळेचे आयोजन केले होते. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून उत्तर आणि दक्षिण ब्लॉकमध्ये हे संग्रहालय विकसित केले जात आहे. 1 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत ही राज्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत खालील मुख्य बाबींचा समावेश होता:
• राज्य आणि केंद्रीय संग्रहालय परिसंस्थेतील प्रमुख सहभागदारांचा सहभाग.
• संग्रहालय व्यवस्थापनामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील मजबूत सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम.
• भारत आणि परदेशातील तज्ञांच्या नेतृत्वाखाली क्षमता निर्माण करणे.
राज्य संग्रहालय परिषदेमुळे भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी संग्रहालयाशी संबंधित व्यावसायिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 80 हून अधिक संस्था, 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 150 हून अधिक सहभागी आणि विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत वस्तुसंग्रहालय परिसंस्थेमधील तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये संग्रहालय व्यवस्थापन आणि कार्यान्वयनासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. काही उल्लेखनीय सत्रांमध्ये पुढील विषय समाविष्ट होते:
• फ्रान्स संग्रहालयातील वास्तुस्थापत्य तज्ञ व्हिन्सेंट सॉलियर यांच्याद्वारे "वास्तुकला आणि भौतिकता" या विषयावर व्याख्यान
• भारतीय वारसा स्थळ संस्थेच्या (IIH) शैक्षणिक घडामोडी विभागाच्या अधिष्ठाता, डॉ. मानवी सेठ, अधिव्याखाता यांचे "संग्रहालयशास्त्र" या विषयावर व्याख्यान.
• आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद - संवर्धन समितीच्या (ICOM-CC) संचालक मंडळाचे अध्यक्ष केट सेमोर यांच्याद्वारे द्वारे " सांस्कृतीक संपत्ती जतन आणि पुनर्संचित करण्याच्या अभ्यासासाठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र (ICCROM) सह भागीदारीमध्ये वारसा संरक्षण" या विषयावर व्याख्यान.
• राष्ट्रीय संग्रहालयाचे अतिरिक्त महासंचालक (ADG) आशिष गोयल यांचे "संग्रह, ललित कलाकृतींची हाताळणी आणि कलाकृतींची देवाणघेवाण " या विषयावर व्याख्यान
• सांस्कृतिक मंत्रालयाचे (MoC) उपसचिव जीवन बच्छाव यांच्याद्वारे "संग्रहालय अनुदान योजना आणि संग्रहालय कायदा" या विषयावर व्याख्यान.
• युनेस्कोचे नवी दिल्लीतील संचालक टिम कर्टिस यांचे "1970 युनेस्को अधिवेशन" या विषयावर व्याख्यान.
• आय आय एम बेंगलोर मधील प्राध्यापक ए दामोदरन यांचे "संग्रहालय व्यवस्थापन" या विषयावर व्याख्यान.
• डीएमबीजी कन्सल्टंट्सच्या संचालक गौरी कृष्णन यांचे "क्युरेशन आणि प्रदर्शन डिझाइन" या विषयावर व्याख्यान.
या परिषदेच्या निमित्ताने राज्यांना त्यांच्या दोन ते तीन प्रमुख संस्थांद्वारे त्यांचे सर्वोत्तम संग्रह आणि पद्धती प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलेहोते आणि या सादरीकरणांचे तज्ञांच्या मंडळाद्वारे परिक्षण केले गेले. समीक्षकांच्या पसंती आणि समीक्षकांच्या पुनरावलोकनाद्वारे लोकप्रिय मतांवर आधारित प्रत्येक विभागामध्ये एक विजेता निवडला गेला.विजेत्यांची यादी या मूळ इंग्रजी प्रसिद्धीपत्रकात पाहू शकता. https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2041271
आगामी ‘युग युगीन भारत’ संग्रहालयात सर्व संभाव्य भागधारकांचा भागीदार म्हणून समावेश केला जाईल याची खात्री करण्यासाठी ही परिषद सांस्कृतिक मंत्रालयाचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. या परिषदेने मंत्रालयाला राज्य संग्रहालय परिसंस्थेतील उपयोजनेसाठी महत्त्वाची क्षेत्रे ओळखण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली असल्याने दोन्ही पक्षांमधील भरीव सहकार्य वाढेल.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2040219
***
JPS/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041280)
Visitor Counter : 65