कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
अवैध खाणकाम करणाऱ्यांची आणि मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची गय करणार नाही, त्यांचा प्रभाव किंवा राजकीय लागेबांधे विचारात घेणार नाही- डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2024 5:35PM by PIB Mumbai
अवैध खाणकाम करणारे, मादक पदार्थांचे तस्कर आणि गोवंश तस्कर यांच्या विरोधात प्रशासन आणि पोलिस यांनी संयुक्तपणे मोहीम सुरू केली आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण,पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ या खात्यांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. अंमली पदार्थांचा वापर, गुरांची बेसुमार तस्करी आणि अवैध खाणकाम यांना आळा घालण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना समाजातील सर्व स्तरांनी पाठबळ द्यावे असे आवाहन करत त्यांनी एका लढ्याचा नारा दिला. ते आज जम्मू आणि काश्मीरमध्ये कथुआ जिल्ह्यात हिरानगर येथे गव्हर्न्मेंट डिग्री कॉलेजमध्ये विकसित भारत कार्यक्रमासाठी युवा वर्गाचे सक्षमीकरण या कार्यक्रमामध्ये बोलत होते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे ते म्हणाले. तस्करी, अवैध खाणकाम किंवा दहशतवाद्यांचे आश्रयदाते यांचा प्रतिबंध करताना, त्या व्यक्ती कितीही प्रभावी व्यक्ती असोत किंवा त्यांचे राजकीय लागेबांधे असोत, त्यांची कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
जे लोक लहान बालकांना आणि इतरांना अंमली पदार्थांकडे ढकलत आहेत त्यांनी हे विचारात घेतले पाहिजे की त्यांची स्वतःची अपत्ये सुद्धा सुरक्षित नाहीत आणि ते देखील याच समाजात राहात असल्याने त्यांना देखील या समस्येची झऴ बसेल, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

या अवैध प्रकारांविरोधात सुरू झालेल्या लढ्यामध्ये समाजातील सर्वच स्तरांनी आपापले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. अशा अवैध प्रकारांविरोधात संकल्प करण्याचे आणि अधिक जास्त पारदर्शकता आणि अधिक प्रामाणिक शासन निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकार करत असलेल्या उपाययोजनांना बळकटी द्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले. दहशतवादी आणि मादक पदार्थांचे तस्कर यांच्यातील संबंध तोडून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2041163)
आगंतुक पटल : 76