वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारच्या धोरणांमध्ये रुपयाला चालना देण्याची क्षमता : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
01 AUG 2024 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
डाळी, रबर व तेलबियांच्या आयातीत घट आणि देशांतर्गत नौवहन, सेमीकंडक्टर निर्मितीला चालना देण्याचे सरकारचे प्रयत्न यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होण्यास सहाय्य होईल,असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
माजी मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यन यांनी लिहिलेल्या “भारत@100: एनव्हिजनिंग टुमॉरोज इकॉनॉमिक पॉवरहाऊस” या पुस्तकाच्या असोचेमने आयोजित केलेल्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. देशाने 8% वार्षिक विकास दर कायम ठेवला तर 2047 पर्यंत देश 55 ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था होऊ शकेल, असा अंदाज सुब्रमण्यन यांनी या पुस्तकात व्यक्त केला आहे.
स्थिर अर्थव्यवस्था भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देईल, असे गोयल यांनी सांगितले. पुढल्या पाच वर्षात केंद्र सरकार समाजातल्या उतरंडीमधल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत अधिक गुणवत्तापूर्ण जीवन सुनिश्चित करेल, असे त्यांनी सांगितले. तेलावर आधारित अर्थव्यवस्थेला इलेक्ट्रिक गतिशीलतेमध्ये बदलण्याच्या प्रयत्नांवरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे आणि निर्मितीमध्ये गुणवत्ता वाढवण्यावर भर देत आहे.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान, मजबूत मुद्रा आणि व्यापक आर्थिक पाया आणि चलनाला बळकटी यांसारखी सरकारची पावले भारताला विकसित राष्ट्र बनण्यास चालना देतील,असे त्यांनी नमूद केले.
"रोजगार निर्मिती आणि नागरिकांना वस्तू व सेवा पुरवण्यातील योगदान, यामुळे पंतप्रधान मोदी संपत्ती निर्मात्यांचा आदर करतात,"असे गोयल यांनी सांगितले.सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या अर्थसंकल्पोत्तर परिषदेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणामधून भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी स्थिर धोरणांची आवश्यकता आणि भारताच्या यशोगाथेत निर्मितीचे महत्त्व समोर आले आहे.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040455)
Visitor Counter : 58